ST Bank Election: अ‍ॅड.गुणरत्न सदावर्तेंचा पॅनल आघाडीवर; विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार?

Political News: एसटी महामंडळाच्या सहकारी बँकेच्या निवडणुकीत चार पॅनलमध्ये जोरदार चढाओढ !
ST Bank Election
ST Bank ElectionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांनी आता एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत आपला पॅनल उभा केला आहे. या बँकेची निवडणूक 23 जूनला राज्यभरातील 281 मतदान केंद्रावर पार पडली. रविवारी (ता.२५) या निवडणुकीची कॉटन एक्सचेंज बिल्डिंग, कॉटन ग्रीन येथे मतमोजणी सुरू आहे.

या मतमोजणीनंतर एसटी महामंडळाच्या सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. अद्याप मतमोजणी सुरू असून वृत्त लिहेपर्यंत ॲड.गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील दुसऱ्या पॅनलला धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ST Bank Election
Devendra Fadnavis Criticism Ncp Over OBC : '' राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षात ओबीसी नेते फक्त...'' ; फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल

एसटी महामंडळाच्या सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत सदावर्ते यांचा एसटी कष्टकरी जनसंघ पॅनल, महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा पॅनल आणि सेवा शक्ती संघर्ष पॅनलमध्ये जोरदार चढाओढ दिसून येत आहे. सध्या तरी पहिल्या क्रमांकावर सदावर्ते यांचा एसटी कष्टकरी जनसंघ पॅनल असल्याचे चित्र आहे. मात्र, या निवडणुकीत बाजी कोण मारणार? हे संपूर्ण मतमोजणी पार पडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

ST Bank Election
Sanjay Raut News : '' राऊतांनी किमान साताऱ्यात येताना तोंडाला लगाम लावावा; नाहीतर...'' ; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा गर्भित इशारा

दरम्यान, आतापर्यंत सुमारे 200 मतदान केंद्रांवरील मतमोजणी पार पडली असून अद्याप जवळपास 81 केंद्रांवरील मतमोजणी बाकी आहे. या निवडणुकीत 19 संचालक पदासाठी जवळपास 65 हजार मतदार आहेत. तर यातील 58 हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. आता या एसटी महामंडळाच्या सहकारी बँकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com