Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis:
Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis: 
मुंबई

Asim Sarode on Maharashtra Political Crisis: ...तर धनुष्यबाण आणि शिवसेना पुन्हा ठाकरेंना मिळेल; असीम सरोदेंचे मोठे विधान

सरकारनामा ब्युरो

Asim Sarode Big Statement: राज्यातील सत्ता संघर्षाच्या प्रकरणात चाळीस आमदार अपात्र ठरल्यास शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राहणार नाही. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मिळेल, असं मत वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे. साम'वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाकडे राज्याचेच नव्हे तर संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर तज्ञांची वेगवेगळी मते येत आहेत. त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (Adv. Sarode said, ...then Thackeray will get Dhanushyaban and Shiv Sena again)

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली असून निर्णय कधीही येण्याची शक्यता आहे.राज्यातील सत्ता संघर्षात न्याय कुणाला मिळणार उद्धव ठाकरे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. तर काही कायदेतज्ञांकडून उद्धव ठाकरे यांना फायदा होईल, असेही मत व्यक्त केलं जात आहे. (Maharashtra Political Crisis)

राज्यातील सत्ता संघर्षावरील तज्ज्ञांच्या मतावर कायदे अभ्यासक आणि अॅड. असीम सरोदे (Asim sarode) यांना विचारले असता ते म्हणाले की,'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम हा निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्ष चिन्ह बाबतचा निर्णयावर होईल. आमदार अपात्रेचा निर्णय आला तर त्याचा उद्धव ठाकरेंना त्याचा थेट फायदा होईल. पण त्यासाठी दाखल केलेल्या प्रकरणावर कोर्टाची सुनावणी प्रक्रियाही पार पाडावी लागेल.

दरम्यान, कालही (९ मे) असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत टि्वटद्वारे मोठं विधान केलं होतं. ''कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी येत्या ११ किंवा १२ तारखेला सर्वोच्च न्यायालयाचा राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येईल असा दावा केला. तसेच न्यायालय आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे पाठवणं सोपा निर्णय म्हणून अवलंबला जाऊ शकतो. दुसरी शक्यता म्हणजे बहुमत चाचणी करण्यासंदर्भात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काढलेला आदेशच रद्द ठरवला जाऊ शकतो. बहुमत चाचणीचा आदेश ही राज्यपालांची कृती घटनाबाह्य असल्याने ती रद्द ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे.

राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात तज्ज्ञ काय म्हणतात?

शिवसेनेच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेऊ शकते. निकालानंतर चाळीस आमदार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. तसेच, चाळीस आमदार अपात्र ठरले तर शिवसेना आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांनी मिळेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनीही मोठं भाकित वर्तवलं आहे. 'सत्ता संघर्षाचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले जाऊ शकते. अध्यक्षांना निर्णयासाठी वेळ दिला जाईल. कायद्यानुसार या प्रकरणात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर राहू शकत नसल्याने राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर सरकार पडेल. (Supreme Court Hearing News)

Edited By- Auradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT