CM Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता राज्य सरकारचा मोठा निर्णय

CM Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईची पुढील दिशा ठरली.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिका फेटाळली. त्यामुळे मराठा आरक्षणावरुन राज्य सरकार आता ‘अ‍ॅक्शन मोड’वर आलं आहे. मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली होती.

ही बैठक आज सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. या बैठकीला मंत्री उदय सांमत, शंभूराज देसाईंसह आरक्षणाच्या प्रक्रियेतील वकीलही उपस्थित होते. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईची पुढील दिशा ठरली. आता याबाबत न्यायालयात तातडीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली जाणार असल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, ''मराठा आरक्षणासंदर्भातील आजची बैठक संपली आहे. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भातील पुनर्विचार याचिका फेटाळली त्याबाबत चर्चा झाली. आता वरिष्ठ विधिज्ञांच्या सल्ल्यानी सुप्रीम कोर्टात तातडीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे'', असं ते म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत तातडीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

(Ediited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT