Sharad Pawar News Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : नेहरूंनी वैज्ञानिकांना दिलेल्या प्रोत्साहनाचे चीज झाले ; पवारांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे केले कौतुक

सरकारनामा ब्यूरो

Chandrayaan-3 News : चांद्रयान-3 चे बुधवारी चंद्रावर लँडिंग झाले आणि नवा इतिहास रचला गेला. दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत जगातील पहिलाच देश ठरला आहे. तसेच भारत अमेरिका, रशिया आणि चीननंतर चंद्रावर लॅंडिंग करणारा चौथा देश ठरला. या ऐतिहासिक क्षणाचा आनंदोत्सव संपूण देशाने साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतानाच त्यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले आहेत.

शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, वैज्ञानिकांचे अभिनंदन आणि आभार, माझ्या मते या यशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे महत्व नसून देशातील वैज्ञानिक आणि मेहनत करणाऱ्या लोकांचे कष्ट आहेत. त्यांचं हे यश आहे. यामध्ये राजकारण न आणता आपण पाहिले पाहिजे. वैज्ञानिकांचे अभिनंदन आणि आभार, कधी यश कधी अपयश येतं. यश आलं म्हणून कधी जमिनीवरचे पाय या देशातल्या वैज्ञानिकांनी हलवले नाहीत.

चांद्रयान- 3 चे (Chandrayaan-3) आज यशस्वी लँडिंग झालेले आहे. जवाहरलाल नेहरू यांनी या देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केले. वैज्ञानिकांना प्रोत्साहित केले. त्याचे आज चीज झाले. मला नेहरू सेंटरमध्ये चांद्रयान- 3 च यशस्वी लँडिंग पाहण्याची संधी मिळाली. भारतातल्या सर्व वैज्ञानिकांचा मी अभिनंदन करतो आभार मानतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात कायम आपण अपडेट असले पाहिजेत हे इस्रोने दाखवुन दिले आहे.

दरम्यान, संपूर्ण देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. चांद्रयान- 3 श्रीहरीकोटा येथून 14 जुलैला चंद्राच्या दिशेने झेपावले होते. या मोहिमेत अनेक अवघड टप्पे यशस्वीरित्या पार केले. त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांची (India) उत्सुकता आणखी वाढू लागली होती.

चांद्रयान- ३ लँड होण्याच्या काही दिवसांआधी रशियाचे लुना-25 हे यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळल्यामुळे त्यांची मोहीम अपयशी ठरली होती. मात्र, भारताच्या शास्त्रज्ञांनी आपले कर्तृत्व दाखवून देतानाच 140 कोटी भारतीयांचा विश्वास सार्थ ठरवला. चांद्रयान-२ अयशस्वी झाल्यानंतर भारताने प्रयत्न सोडले नाही. त्यानंतर त्यामध्ये झालेल्या चुकांमधून धडा घेत, त्यांनी चांद्रयान-३ चे यशस्वी लॅंडिंग केले. यामुळे भारताच्या शिरपैचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT