Ajit Pawar dead Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Death : अजितदादा म्हणजे राजकारणातला खडा शब्द : विनोद तावडेंनी व्यक्त केल्या भावना

Vindod Tawade on Ajit Pawar Demise : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज रोजी बारामतीजवळील विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून विविध पक्षांनी शोक व्यक्त केला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai, 28 January : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (ता. 28 जानेवारी) सकाळी विमान अपघातात बारामतीजवळ मृत्यू झाला आहे. अजितदादांच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या निधनाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून शोक व्यक्त केला जात आहे. भाजपचे सरचिटणीस आणि माजी मंत्री विनोद तावडे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना राजकारणातला खडा शब्द अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बारामतीच्या मातीतील एक झंझावात आज तिथल्या मातीत शांत झाला, यावर विश्वास ठेवणं अशक्य आहे. मा. अजितदादा यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी महाराष्ट्राला चटका लावून जाणारी आहे, असेही विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी म्हटले आहे.

राजकारणातला खडा शब्द; जनतेत रमणारा आणि शब्दाला जागणारा लोकनेता आज हरपला. अलविदा अजितदादा! (Ajit Pawar) अशा शब्दांत विनोद तावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ते म्हणाले, बारामतीच्या मातीतून उठलेले वादळ आज त्याच मातीला शांत झाले! मा.अजितदादा यांच्या दुर्दैवी निधनाच्या बातमीने आज संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि दुःखी झाला आहे. माझ्याबरोबर प्रत्येक राज्याला यावर विश्वास ठेवणे खूप कठीण आहे. राजकारणातील स्पष्ट आणि निर्भीड, जनतेचे लाडके आणि त्यांच्या शब्दावर टिकणारे, लोकनेते आज आम्हाला सोडून गेले. अलविदा अजितदादा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT