Eknath Shinde, Ajit Pawar sarkarnama
मुंबई

अजित पवारांनी पहिला दिवस गाजवला : मंत्र्यांच्या गबाळेपणावर प्रहार!

Assembly Monsoon Session 2022 : अजितदादांच्या सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या

Umesh Bambare-Patil

मुंबई : शिंदे, फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून त्यांच्यावर बोलण्याची एकही संधी न सोडणारे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच तासात सत्ताधाऱ्यांना सुनावले. 'मंत्रीमंडळ आटोपशीर असूनही मंत्र्यांचे लक्ष नाही. कामकाजात जागेवर बसायचे असते. ते बसत नाहीत. हे काही चांगले नाही,' अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांवर सभागृहात हल्ला केला.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नव्या मंत्र्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक पुकारले. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे विधेयक मांडण्यासाठी जागेत उभे राहिले. मात्र, विधेयकाचा क्रमांकात त्यांनी चूक केली.

त्यानंतरच्या विधेयकाला महाजन जागेवर नसल्याचे पवार यांनी हेरले. महाजन यांच्या दोन चुका निदर्शनास आणून देत पवार यांनी थेट सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवले. अधिवेशनाच्या तोंडावर पवार हे शिंदे-फडणवीस सरकार आणि त्यांच्या आमदारांवर सडकून टीका करीत आहेत. त्यात ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच ते लक्ष्य करीत आहेत.

अधिवेशनाच्या आदल्यादिवशीच पवार यांनी सत्ताधाऱ्यांना मस्ती आली का, असा प्रश्न विचारला होता. त्यावरून शिंदे-फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे पवार यांना फटकारले होते. सत्तेतत असताना काही न करणाऱ्यांनी सल्ले देऊ नये, असे सांगत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांचा समाचार घेतला होता. त्यानंतरही अधिवेशनाच्या पहिल्याच तासात पवार यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT