Mumbai News, 28 Apr : दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज (ता.२८) तीन महिने पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक पोस्ट शेअर करत अजितदादा तुमचं नसणं महाराष्ट्राच्या अहिताचं असल्याचं म्हटलं आहे.
आमदार अमोल मिटकरींनी एक्सवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या विविध घटनांचा उल्लेख केला आहे. शिवाय या सर्व घटनांमुळे तुम्ही नसल्यापासून महाराष्ट्र काळा दिवस अनुभवत आहे, असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.
मिटकरींनी पोस्टमध्ये लिहिलं की, "आदरणीय दादा आपल्याला आज जाऊन तीन महिने पुर्ण होत आहेत. याच वेळात महाराष्ट्र काळा दिवस अनुभवत होता. या तीन महिन्यात आपण गेल्यानंतर महाराष्ट्रात बऱ्याच गोष्टी घडल्या. भोंदू बाबांना पेव फुटले, ट्राफिक चे प्रश्न बिकट होत गेले.
गोविंद पानसरे यांच्या सारख्या लेखकांना मरणोपरांत मारण्याची भाषा ऐकायला मिळाली, काही जैन मुनींचे प्रक्षोभक हिंसेला प्रोत्साहन देणारे विखारी विचार ऐकायला मिळाले, अमराठी उपऱ्यांचा मराठी माणसांवरचा राग बघायला मिळाला, अजून महाराष्ट्र खूप काही बघणार आहे.
मात्र तुमच नसणं हे महाराष्ट्रासाठी आता अहिताचे आहे, दादा मिस यू.", असं म्हणत मिटकरींनी अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्रात घडलेल्या घटनांचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्यांनी भोंदूबाबांचा उल्लेख करत अशोक खरात प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे.
तर जैन मुनींच्या वक्तव्यावरून देखील मिटकरींनी चिंता व्यक्त केली आहे. शिवाय अजित दादा असते तर या गोष्टींना त्यांनी आळा घातला असता, असाच सूर मिटकरींच्या पोस्टचा असल्याचं दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.