Kolhapur crime : कोल्हापूर हादरलं! परतवाड्याच्या अयानप्रमाणेच शाहिदने मुलींचे व्हिडिओ बनवले अन् थेट..., पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

kolhapur blackmail video case : कोल्हापुरातील पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे नावाच्या तरूणाने मैत्रिणींसोबत प्रेमाचे संबंध बनवून तिचा व्हिडिओ आपल्या मित्राला सेअर केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. शिवाय त्याच्याकडे आणखी आठ ते दहा व्हिडिओ असल्याचा पोलिसांना संशय आहे.
kolhapur love trap crime
Police investigating the Kolhapur viral video case involving a love trap and blackmail crime, highlighting rising cyber exploitation incidents.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Crime News, 28 Apr : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे अनेक तरुणींच्या लैंगिक शोषणाने आणि अश्लील व्हिडीओ प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदने केलेले अनेक काळे कारनामे उघडकीस येत आहेत.

मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांनी त्यांचे व्हिडिओ बनवायचा आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचा हे तपासात उघड झालं आहे. अशातच आता परतवाडाची पुनरावृत्ती कोल्हापूर जिल्ह्यात झाली आहे.

पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे नावाच्या तरूणाने मैत्रिणींसोबत प्रेमाचे संबंध बनवून तिचा व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे नावाच्या तरूणाने युवतीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी संबंध ठेवले आणि त्याचे व्हिडिओ देखील बनवले. त्यानंतर त्याने हे व्हिडिओ आपल्या मित्राला पाठवले.

kolhapur love trap crime
Modi Government decision : अखेर मोदी सरकारकडून ऐतिहासिक निर्णयाची अधिकृत घोषणा; ममतादीदींच्या जुन्या सहकाऱ्यावर सोपविली अत्यंत महत्वाची कामगिरी

या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने संबंधित तरूणीला ब्लॅकमेल केलं. त्यानंतर या तरूणीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दिल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, आता या प्रकरणी आरोपी शाहिग याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

kolhapur love trap crime
Gopichand Padalkar : “विशाल पाटलांना तिकीट मिळणार नव्हतंच!” पडळकरांच्या आरोपावर विश्वजित कदमांचा सणसणीत टोला; म्हणाले, 'ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प...'

तर या शाहिद सनदेकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. शाहिदीने ज्याला हे व्हिडिओ पाठवले तो मित्र शाहरुख सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, या आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी हिंदू आणि मुस्लिम समाजाकडून पोलिसांकडे मागणी करण्यात आली आहे. तसंच या घटनेचा निषेध करण्यासाठी पुलाची शिरोली गाव आज बंद ठेवण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com