BJP MLC List : भाजपने विधानपरिषदेसाठी पाठवलेली 30 जणांची यादी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी मागे पाठवली, अर्धी नावे कमी, कुणाचा पत्ता कट?

Vidhan Parishad Elections 2026 : महाराष्ट्र भाजपने विधानपरिषदेसाठी एकूण 14 जणांची सुधारित यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे. त्यामुळे आधीच्या 30 जणांपैकी कोणाची नावे वगळली गेली आणि नव्या यादीत कोणाला संधी देण्यात आली, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
Maharashtra BJP MLC List | Vidhan Parishad Elections 2026
Maharashtra BJP MLC List | Vidhan Parishad Elections 2026Sarkarnama
Published on
Updated on

Vidhan Parishad Elections 2026 : महाराष्ट्रातील विधानपरिषदेसाठी भाजपच्या कोअर कमिटीने जवळपास 30 जणांची यादी तयार करून ती दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवली होती. मात्र, अवघ्या 6 जागांसाठी 30 जणांची यादी पाठवल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी या यादीतील डझनभर नावे कमी करून सुधारित यादी पुन्हा पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानुसार, आता महाराष्ट्र भाजपने विधानपरिषदेसाठी एकूण 14 जणांची सुधारित यादी पुन्हा दिल्लीला पाठवली आहे. त्यामुळे आधीच्या 30 जणांपैकी कोणाची नावे वगळली गेली आणि नव्या यादीत कोणाला संधी देण्यात आली, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. या 9 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार आहेत. मात्र, अद्याप विधानपरिषदेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आलेले नाहीत.

तर या 6 जागांसाठी भाजपकडून सुरुवातीला 30 जणांची यादी तयार करण्यात आली होती. ही यादी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली होती. मात्र, यादी मोठी असल्याने मर्यादित नावेच पाठवण्याच्या सूचना दिल्लीतून आल्यानंतर महाराष्ट्र भाजपने जवळपास अर्धी नावे कमी करून सुधारित यादी पुन्हा पाठवली आहे.

Maharashtra BJP MLC List | Vidhan Parishad Elections 2026
Kolhapur crime : कोल्हापूर हादरलं! परतवाड्याच्या अयानप्रमाणेच शाहिदने मुलींचे व्हिडिओ बनवले अन् थेट..., पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

दरम्यान, विधानपरिषदेसाठी उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपमधील अनेक इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अंतिम यादीतून ज्यांची नावे वगळली जातील, त्यांच्यात नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे भाजप सध्या सावध भूमिका घेत असून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra BJP MLC List | Vidhan Parishad Elections 2026
Maharashtra industry news : इराण युद्धाचा फटका! राज्यातील 40 हजार कंपन्यांना टाळं लागण्याची भीती

सूत्रांच्या माहितीनुसार, विधानपरिषदेसाठी पक्षातील जुने आणि तळागाळातील कार्यकर्त्यांनाही संधी दिली जाणार आहे. त्यामुळे भाजपकडून कोणाच्या गळ्यात विधानपरिषदेच्या आमदारकीची माळ पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com