Chief Minister Devendra Fadnavis addresses party leaders after Ajit Pawar’s death, announcing the suspension of ZP election campaigning as a mark of respect. Sarkarnama
मुंबई

ZP Elections 2026 : देवेंद्र फडणवीस ZP निवडणुकीसाठी प्रचार करणार नाहीत..., अजितदादांच्या निधनामुळे घेतला मोठा निर्णय!

Fadnavis Halts ZP Election Campaign : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे नुकत्याच काही दिवसांवर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार न करण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 01 Feb : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी (ता.२८) विमान अपघातात निधन झालं. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यभरात शोकाकूल वातावरण असतानाच काल शनिवारी (ता. ३१) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या निधनानंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे नुकत्याच काही दिवसांवर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार न करण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतला आहे.

आगामी झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या ७ दिवसांत २२ सभा होणार होत्या. मात्र आता त्यांनी प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या सभा घेतल्या जाणार नाहीत, अशी माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादीचा निर्णय काय?

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचार न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर फडणवीसांनी देखील अजितदादांच्या निधनामुळे आपला प्रचार थांबवल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी पक्षाने आगामी निवडणुकीत प्रचार आणि रोड शो न करता केवळ मतदारांना पत्रके वाटून प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांनी घरोघरो जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवावी असा आदेश पक्षाकडून देण्यात आला आहे. शिवाय विजयी झाल्यांनतरही मिरवणूक काढली जाणार नसल्याचं पक्षाने स्पष्ट केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT