Prajakt Tanpure, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : अजितदादांचा शरद पवार गटाच्या प्राजक्त तनपुरेंवर डोळा; सभागृहात नेमकं काय घडलं?

Prajakt Tanpure Vidhan Sabha Session : अधिवेशनात प्राजक्त तनपुरेंनी शेतकऱ्यांकडे सत्ताधारी लक्ष देत नसल्याची तक्रार केली.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील सत्ताधारी अजित पवार गटातील अनेक नेते शरद पवार गटात जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. त्यातच अजित पवारांनी शरद पवार गटातील आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे बारीक लक्ष असल्याचे सांगितले. अधिवेशनातील या चर्चेने मात्र राज्यात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अधिवेशनात प्राजक्त तनपुरेंनी Prajakt Tanpure शेतकऱ्यांकडे सत्ताधारी लक्ष देत नसल्याची तक्रार केली. ते म्हणाले, राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्याचा दावा करते. मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या, गरजा काय आहेत, हे समजलेले नाही. एक रुपयाच्या विमा योजनेतून नैसर्गिक आपत्तीतून होणाऱ्या नुकसानीची भरपाई वेळेवर मिळावी हीच माफक अपेक्षा आहे. मात्र 2023 मधील खरीप हंगामाचेच पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत.

सरकार मात्र मदतीचे मोठमोठे आकडे जाहीर करते. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काडीचीही मदत झालेली नाही. स्थानिक अपत्ती झाली तर 72 तासांत विमा कंपनीला माहिती देणे गरजेचे असते. मात्र याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत. यातही मोठे गौडबंगाल आहे. पीक विम्याच्या प्रतिनिधींनी लोकल कॅलॅमिटीच्या नावाखाली लोकांकडून 500-1000 रूपये घेतल्याच्या तक्रारी आहेत.

यातून पीक विम्याच्या लोकांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. या प्रकाराकडे मात्र सरकारचे अजिबात लक्ष नाही. त्यांचा पैसे वाटण्याकडेच लक्ष आहे. सत्ताधाऱ्यांचे आमच्याकडे लक्ष नाही, अशी तक्रारच प्राजक्त तनपुरेंनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

यावर उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar उठले आणि तनपुरेंनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलले. ते म्हणाले, मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचे सर्व मुद्दे ऐकतोय. ते मात्र खुशाल आम्ही लक्ष देत नाहीत, अशी तक्रार करतात. माझे प्राजक्तकडे इतके लक्ष आहे, मात्र तो जयंत पाटील यांच्याकडेच जास्त लक्ष देतो, अशी मिश्किल टिपण्णी केली. यावर सभागृहात एकच हशा पिकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT