Ambadas Danve : अंबादास दानवे नीलम गोऱ्हेंवर भडकले अन् सभागृहातील वातावरण तापलं; विधानपरिषदेत घडलं काय?

Neelam Gorhe : पक्षपाती करणाऱ्या उपसभापतींचा धिक्कार असो, अशा घोषणा देत विरोधकांनी विधानपरिषद दणाणून सोडलं.
Neelam Gorhe | ambadas danve
Neelam Gorhe | ambadas danvesarkarnama

विधानपरिषदेत नीलम गोऱ्हे विरोधकांच्या निशाण्यावर आल्या आहेत. नीलम गोऱ्हे पक्षपातीपणा करत असल्याची टीका विरोधकांनी केली. मला बोलून देत नसल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर केला.

यावेळी 'पक्षपाती करणाऱ्या उपसभापतींचा धिक्कार असो,' अशा घोषणांनी विधानपरिषद दणाणून गेली. तर, "विरोधकांनी आरडा-ओरडा केल्यानं मी शांत बसणार नाही," असा इशारा नीलम गोऱ्हेंनी दिला.

नेमकं घडलं काय?

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas Danve ) बोलायला उभे राहिले. भाजपच्या गटनेत्याला बोलू दिले जाते. पण, मला बोलू दिले जात नसल्याचं म्हणत दानवे गोऱ्हेंवर भडकल्याचं दिसलं.

Neelam Gorhe | ambadas danve
Ambadas Danve On Mahayuti Government : महायुती सरकार जरांगेंची फसवणूक करतंय; दानवेंनी भडका उडवून दिला

दानवे म्हणाले, "मी विरोधी पक्षनेता आहे, पण उपसभापती मला बोलून देत नाहीत. भाजपच्या गटनेत्याला बोलण्याची संधी दिली जाते आणि मला बोलू दिले जात नाही. हा तुमचा कोणता नियम आहे? तुम्ही एक बाजू घेता. तुम्ही का बोलू देत नाही?"

Neelam Gorhe | ambadas danve
Eknath Shinde : CM शिंदेंची 'ऑर्डर' धडकली अन् कमिश्नर कैलाश शिंदे, राहुल गेठेंनी पब, बारचा काढला 'धूर'

यानंतर उपसभापती गोऱ्हेंनी ( Neelam Gorhe ) म्हटलं, "तुम्ही आरडा-ओरडा केल्यानं मी शांत बसणार नाही. कारण नसताना माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत. विरोधी पक्षनेत्यांना सतत बोलायला दिलं जातं. तरीही माझ्यावर आरोप केले जातात. सभागृहाची अशी पद्धत नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com