Ajit Pawar Assembly Speech Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar : विधानसभेत अजितदादांची गाडी सुसाट; स्मारकावरून वडेट्टीवारांना सुनावले, ‘आरं कोणाची स्मारकं बांधा, कशाची स्मारकं बांधा?’

Maharashtra Budget Session : अर्थसंकल्पावर चर्चेला उत्तर देताना अजितदादांची गाडी सुसाट सुटली होती. त्यांनी सुरुवातीलाच जयंत पाटील यांना फैलावर घेतले, तसेच विरोधी बाकीवर उपस्थित असलेल्या मोजक्या संख्येवरून फिरकी घेतली.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 17 March : अर्थसंकल्पावर चर्चेला उत्तर देताना अजितदादांची गाडी सुसाट सुटली होती. त्यांनी सुरुवातीलाच जयंत पाटील यांना फैलावर घेतले, तसेच विरोधी बाकीवर उपस्थित असलेल्या मोजक्या संख्येवरून फिरकी घेतली.

अजितदादांच्या या बॅटिंगमधून महाविकास आघाडीचे भास्कर जाधव, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार यांच्या तुफान फटकेबाजी केली. स्मारकावरून केलेली टिपण्णीवरून अजितदादांनी विजय वडेट्टीवारांना चांगलेच फैलावर घेतले. ‘अरं कोणीची स्मारकं बांधा, कशाची स्मारकं बांधा. आम्ही तुमची स्मारकं बांधा, असं कधी बोललो का, असा तडाखा अजितदादांनी भाषणातून लगावला.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, विधानसभेतील अनेक सदस्यांनी मांडलेल्या मुद्यांना मी माझ्या परिने सविस्तरपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यापूर्वी मी विरोधकांना एक आवाहन करणार आहे. आपण अर्थसंकल्पाला जरूर दोष द्या.

लोकशाहीमध्ये तो तुम्हाला अधिकार आहे. मला दोष दिला तर मला काही वाटणार नाही, कारण मी अर्थसंकल्प मांडलेला आहे. पण भावनेच्या भरात जिव्हारी लागेल, कोणावर अन्याय होईल किंवा देशाच्या उभारणीत योगदान देणाऱ्याबद्दल विधानं करू नये, अशी विनंती मी करतो.

मी त्या विधानांचा उल्लेख करत नाही. पण, काही काही सदस्यांनी बोलताना अशी काही विधानं केली की आपण कुठं बोलतोय, काय बोलतोय, या सभागृहाची परंपरा काय आहे, याचाही ताळमेळ त्यांनी ठेवलेला नव्हता, असा टोला त्यांनी लगावला.

ते म्हणाले, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) येथे आहेत, ते एकेकाळी राज्याचे विरोधी पक्षनेते होते. त्यांच्यासोबत काम करत होतो. पण भाषण करताना त्यांनी भावनेच्या भरात स्मारक बांधा, असे विधान केलं. अरं कोणीची स्मारकं बांधा, कशाची स्मारकं बांधा. नाही तर २०२९ मध्ये तुमची स्मारकं बांधायची तयारी करा. कुणाची स्मारकं. आम्हाला एवढ्या मतांनी निवडून दिलं म्हणून स्मारकं बांधायला निघालात का?

काय आपण बोलतोय, उचलली जीभ लावली टाळ्याला. ही काय पद्धत झाली का? असे ते बोलून गेले. एकेकाळी ते मंत्रिमंडळात माझे सहकारी होते. निवडणुकीत जय पराजय असतो, पण अशा प्रकारची भाषा वापरणं योग्य नाही. २०२४ मध्ये ह्यांचा दारुण पराभव होऊनही आम्ही कधी तुमची स्मारकं बांधा असं म्हटलं. म्हणायचं कारणही नाही. ही कुठली पद्धत? असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

ह्यांना अरे म्हणता येत असेल तर मलाही का रे म्हणता येतं. पण आम्ही समंजस भूमिका घेतो. नको बघा राज्याची १२-१३ कोटी जनता बघत असते. काहींनी काहींनी तर हे सरकार श्रीमंतांचे आहे, गरिबांचं नाही. काय गरिबांचं नाही.

उलट या सराकरने जास्तीत जास्त गरिबांना त्यांची गरिबी हटविण्याचा प्रयत्न केलेले आपण सर्वांनी पाहिलं आहे. जास्तीत जास्त थेट लाभ देणारं महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरचे हे पहिलं सरकार आहे. आम्ही थेट सभासदांना डीबीटीमध्ये पैसे दिले आहेत. हे पाठीमागं कुणीही केलं नाही, असा दावाही केला.

ते म्हणाले, टाटा उद्योग समूहाचं अवमान होईल, असं वाक्य एका सदस्याने बोलून दाखवलं. मी ते वाक्य बोलून दाखवणे उचित वाटत नाही. त्यामुळे ते वाक्य मी बोलणार नाही. टाटा समूहाविषयी एक आदराचे स्थान प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे. त्यांच्याविषयी अनुद्‌गार काढणे, याबाबत वाईट वाटतंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT