Solapur Politic's : पवारांच्या आमदाराची भाजप आमदाराला विनंती; म्हणाले ‘आतून-बाहेरून जेवढी मदत करता येईल, तेवढी मदत करा’

Abhijeet Patil's Request to Samadhan Autade : अभिजीत पाटील यांनी आमदार होण्यासाठी केलेल्या तपश्चर्येचे कौतुक करून भाजपचे आमदार समाधान आवताडे म्हणाले, इकडून दणका दिला, अभिजीत पाटील तिकडे गेले, तिकडून दणका दिला, आता तर आमदार राजाभाऊंचे नेतृत्व मान्य केल्यामुळे त्यांना इकडे यावंच लागेल, असे सांगताच एकच हशा पिकला.
Abhijeet Patil
Abhijeet PatilSarkarnama
Published on
Updated on

Mangalvedha, 16 March : मंगळेवढ्यात समाधान आवताडे, उत्तम जानकर, राजू खरे आणि आभिजीत पाटील या आमदारांचा सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या जोरदार राजकीय जुगलबंदी रंगली. ‘सोलापूर जिल्ह्याचा सगळे मिळून विकास करू. तुम्हाला आतून बाहेरून जेवढी मदत करता येईल, तेवढी करा’ असे आवताडेंकडे पाहत पाटील म्हणाले, त्यावर आवताडेंनाही ‘अभिजीत पाटील यांनी आता राजू खरेंचे नेतृत्व मान्य केल्याने त्यांना इकडे यावे लागेल’ असा सूचक टोला लगावला.

मंगळवेढा (Mangalvedha) येथे उद्योजक वैभव नागणे यांच्या पुढाकारातून कल्पतरू परिवार, व्ही. एन. ग्रुप यांच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले, ‘विधानसभा निवडणूक लढवायचीच, या जिद्दीने अत्यंत कमी काळात पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील मतदारांशी संपर्क वाढवला. आमदार होण्याचे स्वप्न समोर ठेवून दोन वर्षे मंगळवेढा आणि पंढरपूर मतदारसंघातील घर ना घर फिरलो, त्यामुळे एक नातं निर्माण झालं होतं.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारासंघात केलेली तयारी बघून ‘गडी लय तयारीचा’ म्हणून माढावाल्याने मला निवडून दिलं. लढण्याची जिद्द निर्माण झाल्याने लढत राहिलो आणि लढता लढता जिंकलो. त्यामुळे मी आमदारकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न विधानसभेत मांडू शकलो, असेही अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी स्पष्ट केले.

Abhijeet Patil
Vighnahar Sugar factory : 'विघ्नहर'वर सत्यशील शेरकरांचे एकहाती वर्चस्व; शेरकरांच्या तीन पिढ्यांची कारखान्यावर 40 वर्षांपासूनची सत्ता कायम!

सध्या व्यासपीठावरील तिघे आमदार राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून पंढरपूरच्या दृष्टीने धडाकेबाज माणूस हवा आहे, सगळे मिळून सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू, असे आमदार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांच्याकडे पाहत सूचक इशारा करत ‘तुम्हाला आतून आणि बाहेरून आम्हाला जेवढी मदत करता येईल, तेवढी करा, अशी विनंतीही आमदार पाटील यांनी आवताडेंना केली.

अभिजीत पाटील यांनी आमदार होण्यासाठी केलेल्या तपश्चर्येचे कौतुक करून भाजपचे आमदार समाधान आवताडे म्हणाले, इकडून दणका दिला, अभिजीत पाटील तिकडे गेले, तिकडून दणका दिला, आता तर आमदार राजाभाऊंचे नेतृत्व मान्य केल्यामुळे त्यांना इकडे यावंच लागेल, असे सांगताच उपस्थितीतून हशा पिकला. भाषणातील एक व आतील एक यावरून खुद्द आवताडे यांनाही हसू आवरेना.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात मी जरी नसलो तरी या मतदारसंघाचा जावई म्हणून अडचणीच्या वेळी हाक मारा. आपण सहकार्य करू, असा शब्द मोहोळचे आमदार राजू खरे यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उद्योजक वैभव नागणे यांना आमदार करण्यासाठी समाधानदादा तुम्हीसुद्धा माझा आदेश मानायचा, अशी विनंतीवजा सूचना आमदार उत्तम जानकर यांनी आमदार समाधान आवताडे यांना केली.

Abhijeet Patil
Vidhan Parishad Election : ठाण्याच्या माजी महापौरांसह ही चार नावे शिवसेनेकडून आघाडीवर; कुणाला लागणार लॉटरी

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, सध्या मी राजकारणापासून चार हात लांब असल्यामुळे बऱ्याच कार्यक्रमात मला अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारावी लागत आहे. व्यासपीठावरील सर्व आमदारांनी जिल्ह्यातील सर्व भागाला उजनीचे पाणी कसे देता येईल, याकडे लक्ष द्यावे, असेही आवाहन केले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com