Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं ठरलं; दिवाळीनंतर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार !

NCP Ajit Pawar Group Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या काळात राज्यभर दौरे करणार

Deepak Kulkarni

Mumbai News : मराठा आरक्षण प्रश्नावरून राज्यभर आंदोलन पेटल्याने सर्वच पक्षाच्या अडचणीत वाढ झाली होती.आंदोलकांनी नेतेमंडळीला गावबंदी केल्याने सर्वच पक्षांनी कार्यक्रम व यात्रा रद्द केल्या होत्या. मात्र, मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्याने नेतेमंडळींनी काहीसा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांनी ५ नोव्हेंबरपासून विदर्भात यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार दिवाळीनंतर राज्यभर दौरे करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाची शुक्रवारी सायंकाळी बैठक पार पडली. या बैठकीस खासदार सुनील तटकरे यांच्यसह नेतेमंडळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीनंतर माहिती देताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या काळात राज्यभर दौरे करणार आहेत.

अजित पवार यांचे स्वतंत्रपणे आणि महायुतीच्या नेत्यांसोबत दौरे आयोजित करण्यात आले आहेत. त्यासोबतच दिवाळीनंतर होणाऱ्या अजित पवारांच्या दौऱ्याबाबत त्यांनी या वेळी माहिती दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अपात्रता प्रकरणात लोकशाहीच्या मार्गाने आम्हीदेखील पिटिशन दाखल केली असून, कारवाईची मागणी केली आहे. संसदरत्न नेहमीच अदृश्य शक्ती, असा उल्लेख करतात. मात्र, आमच्यासोबत आलेल्या आमदारांची संख्या मोठी असल्याने त्यांना नैराश्य आलेले आहे.

शपथविधीच्या दिवशी डॉ. अमोल कोल्हे आमच्यासोबत होते. त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे संसदरत्नांचा दावा हा कोर्टाच्या निर्णयानंतर स्पष्ट होईल, असे या वेळी बोलताना तटकरे (Sunil Tatkare) यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री अजित पवार गटाच्या आमदारांवर नाराज ?

मराठा आरक्षणाबाबत मंत्रालयात सत्ताधारी आमदारांकडून करण्यात आलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नाराजी बोलून दाखवली असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी मंत्रालयाबाहेर गुरुवारी आंदोलन केले होते. मंत्रालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या आमदारांमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांचा सहभाग होता.

यावरूनच मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत सत्तेत असताना अशी आंदोलनं करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनीच आंदोलन केल्यास जनतेत चुकीचा मेसेज जाऊ शकतो, अशा आंदोलनामुळे महायुतीत समन्वय नसल्याचा मेसेज जाऊ शकतो. महायुती म्हणून आपण सर्वांनी अशा परिस्थितीत एकत्र राहायला हवं, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT