Amol Kolhe News : खासदार कोल्हेंनी तटकरेंच्या दाव्यातील हवाच काढली; म्हणाले," शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी..."

NCP Political News : " आपण भूमिका बदलली..."
Amol Kolhe - Sunil Tatkare
Amol Kolhe - Sunil Tatkare Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. यानंतर पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले. दोन्ही गटाच्या नेतेमंडळींकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे खासदार सुनील तटकरेंचं निलबंन करण्यात यावे, अशी मागणी केली होती.

यावर तटकरेंनी सुळे यांनी हे विधान नैराश्यातून केले असल्याचा दावा करतानाच खासदार अमोल कोल्हेंबाबतदेखील खळबळजनक विधान केले होते. आता तटकरेंच्या दाव्यावर खासदार अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Amol Kolhe - Sunil Tatkare
LokSabha Election 2024 : ''लोकसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा'' ; महायुतीच्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या सूचना!

खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शुक्रवारी मीडियाशी संवाद साधला. त्यांनी अजित पवार गटाचे खासदार आणि नेते सुनील तटकरेंनी केलेल्या दाव्यावर भाष्य केले. कोल्हे म्हणाले, शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी मी शरद पवारसाहेबांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे. आजही मी त्यांच्यासोबत आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या प्रतिज्ञापत्रातही मी पवारसाहेबांसोबत असल्याचं नमूद केलं आहे. त्यामुळं यावर अधिकचं भाष्य करण्याची गरज मला तरी वाटत नाही. आपण भूमिका बदलली नसल्याचेही खासदार कोल्हे यांनी या वेळी स्पष्ट केले.

जुलै महिन्यात अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ मंत्र्यांच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे हजर होते. तसेच त्यांनी अजित पवार गटासोबत असल्याचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांना दिले होते. त्यांनी अजित पवारांना पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्यामुळं ते आमच्यासोबत आहेत असं आम्ही मानतो, असा दावा तटकरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

तटकरे काय म्हणाले होते...?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळेंच्या मागणीवर प्रत्युत्तर केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील यांच्या विरोधात आम्ही पिटिशन दाखल केलं आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आम्हाला समर्थन दिलं आहे. त्यांनी अजित पवारांना पाठिंबा असल्याचं प्रतिज्ञापत्र दिलं आहे. त्यामुळं ते आमच्यासोबत आहेत, असं आम्ही मानत असल्याचे तटकरे यांनी सांगितले होते.

संसदरत्न नेहमी अदृश्य शक्ती...

तटकरे म्हणाले, 2 जुलैला आम्ही सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. नागालँड, झारखंड येथील आमदारांनीदेखील आमच्या या निर्णयाला समर्थन दिलं आहे. आम्ही राज्यभर दौरा सुरू करत आहोत. पहिला दौरा विदर्भातून असेल. त्यानंतर कोकण पश्चिम महाराष्ट्र दौरा असेल. राज्यातील जनता अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आहे.

Amol Kolhe - Sunil Tatkare
Maharashtra Politics: अजित पवार गटाच्या आमदारांवर मुख्यमंत्री नाराज ? महायुतीच्या बैठकीत काय घडलं ?

...म्हणून अजितदादांच्या नेतृत्वात जाण्याचा निर्णय !

याचवेळी तटकरेंनी खासदार सुप्रिया सुळेंवर (Supriya Sule) निशाणा साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादीतील एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदारांचा आम्हाला असलेला पाठिंबा पाहूनच त्यांनी नैराश्यातून आमच्यावरील कारवाईची मागणी केली असावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

तसेच संसदरत्न नेहमी अदृश्य शक्ती असा सातत्यानं उल्लेख करत असतात. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अलीकडच्या काळातील निर्णय याचा आधार घेऊन आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात जाण्याचा निर्णय घेतला आहे, असंही तटकरे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Amol Kolhe - Sunil Tatkare
MLA Govardhan Sharma Passed Away : सच्चा स्वयंसेवक आणि विदर्भवादी नेता हरपला, आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories