Ajit Pawar-Jayant Patil-Amol Mitkari
Ajit Pawar-Jayant Patil-Amol Mitkari  Sarkarnama
मुंबई

NCP MLA Meet Jayant Patil : होय, आमचे आमदार जयंत पाटलांना भेटले; पण... राष्ट्रवादी नेत्याचे स्पष्टीकरण

Vijaykumar Dudhale

Mumbai, 28 June : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटले होते. ते आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी स्पष्टीकरण देताना ‘कुठचाही आमदार कुठेही जाणार नाही,’ असे म्हटले आहे.

आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, जयंत पाटील (Jayant Patil) यांना जे आमदार (MLA) भेटले होते, त्यातील काही आमदारांशी गुरुवारी (ता. २७ जून) रात्री उशिरा मी स्वतः बोललो. त्या आमदारांचे म्हणणं आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ज्या पद्धतीने काल योगायोगाने भेट झाली. त्याच पद्धतीने विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात जयंत पाटील बसले होते. जेवणाची वेळ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झिरवळ यांच्या दालनात गेले होते.

जयंत पाटील हे महाराष्ट्रातील एक मोठे नेते आहेत, त्यामुळे झिरवळ यांच्या दालनात बसलेल्या जयंत पाटील यांना ते भेटले आणि चर्चा केली. याचा जर कोणी वेगळा अर्थ काढत असेल की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, तर ते त्या व्यक्तीचं अज्ञान असावं. कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही. सर्व आमदार अजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा दावाही मिटकरी यांनी केला.

भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी ‘अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा’ असे जे वक्तव्य केले. त्यावर मिटकरी म्हणाले कोणीही गल्लीबोळातील उठतो आणि काहीही बोलतो, त्याला आम्ही काडीची किमत देत नाही. पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याला काल त्याची जागा दाखवून दिली आहे.

प्रवीण दरेकर किंवा सुरेश धस या भाजपच्या लोकांना आमची लायकी काढण्याचे एकमेव काम राहिलं आहे. बीडमधून पंकजा मुंडे यांचा पराभव कसा झाला आणि बजरंग सोनवणे कसे निवडून आले, हे त्यांनी आता सांगावे. पंकजा मुंडे यांच्या पराभवामागं कोणाचा हात आहे, हे आम्हाला उघड करायला लावू नका.

आमची लायकी काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव लोकसभेला कसा झाला, याचे उत्तर सुरेश धस यांनी द्यावे, असे आव्हान अमोल मिटकरी यांनी धस यांना दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT