Gopichand Padalkar Vs Jayant Patil : 'सांगली जिल्हा बँकेतील घोटाळे बहाद्दरांचा म्होरक्या जयंत पाटील' ; पडळकरांचा गंभीर आरोप!

Gopichand Padalkar on Sangli District Bank : बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा या मागणीसाठी चाबूक मोर्चा काढणार
Gopichand Padalkar Vs Jayant Patil
Gopichand Padalkar Vs Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli District Bank News : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमावा या मागणीसाठी 25 जून रोजी जिल्हा बँकेवर चाबूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचं माजीमंत्री सदाभाऊ खोत आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे.

तसेच बँकेतील घोटाळे बहादरांचा म्होरक्या जयंत पाटील(Jayant Patil) असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच बँकेच्या कारभाराबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील चौकशीची मागणी केली असून त्यांनी देखील मुख्य सचिवांना चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्यामुळे लवकरच बँकेवर प्रशासक नेमले जाईल, असा विश्वास देखील यावेळी आमदार पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

Gopichand Padalkar Vs Jayant Patil
Sangli News: सांगली बँक गैरव्यवहार प्रकरणात 'स्वाभिमानी'ची उडी; राजू शेट्टींचा आक्रमक पवित्रा

बँकेतील आजीमाजी संचालकांकडून मोठ्या कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला आहे. बेकायदेशीररित्या कर्जांचे वाटप देखील करण्यात आलेले आहे. तसेच अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या माध्यमातून बोगस कर्ज देखील घेण्यात आल्याचा आरोप यावेळी गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी केला आहे.

Gopichand Padalkar Vs Jayant Patil
Drought Fund Corruption : दुष्काळनिधी घोटाळ्याप्रकरणी पडळकर आक्रमक; ‘सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा’

याशिवाय, जिल्हा बँकेची परिस्थिती ही 'चोरचोर मोसरे भाई' अशा पद्धतीचा कारभार असून बँकेमध्ये दलाल आणि ठेकेदार घुसलेले आहेत, असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत(Sadabhau Khot) यांनी केला आहे. तसेच, आमदार-खासदार मंत्री झाल्यावर संचालक पद कशाला हवे,असा संतप्त सवाल करत जिल्हा बँक ही टग्याची बँक, अशी टीका यावेळी सदाभाऊ खोत यांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com