Dindori Constituency 2024 : धक्कादायक, महायुतीचे नेते नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या व्यासपीठावर !

Narhari Zirwal Political News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ सकाळीच येऊन थांबले होते. मंदिरातील कार्यक्रम झाल्यानंतर नागरिकांच्या आग्रहाखातर ते महाविकास आघाडीच्या भगरे यांच्या प्रचार सभेलाही उपस्थित राहिले.
Narhari Zirwal politics
Narhari Zirwal politicsSarkarnama

Narhari Zirwal News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात शुक्रवारी धक्कादायक प्रकार घडला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर उपस्थित राहिले.

निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे यांचा शुक्रवारी तिसगाव (दिंडोरी) येथे प्रचार दौरा होता. हा दौरा पूर्वनियोजित होता. यावेळी भगरे यांचा प्रचार दौरा सुरू होण्याआधीच गावातील मारुती मंदिरातील एका कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ सकाळीच येऊन थांबले होते. मंदिरातील कार्यक्रम झाल्यानंतर नागरिकांच्या आग्रहाखातर ते महाविकास आघाडीच्या भगरे यांच्या प्रचार सभेलाही उपस्थित राहिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narhari Zirwal politics
Nagar Lok Sabha 2024: अजितदादा, सुप्रियाताई, पंकजाताई, आठवलेंच्या निशाण्यावर कोण ? नगरमध्ये सभांचा धडाका

झिरवळ थेट व्यासपीठावर जाऊन बसले. यावेळी त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते श्रीराम शेटे यांच्याशी चर्चा देखील केली. नंतर ते तेथून निघून गेले. झिरवळ महायुतीचे नेते असताना ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या व्यासपीठावर गेल्याने राजकीय कार्यकर्त्यांत तो चांगलाच चर्चेचा विषय ठरला. हा महायुतीला राजकीय धक्का मानला जात आहे. झिरवळ यांनी हा 'मेसेज' देण्यासाठी ठरवून केलेला कार्यक्रम होता की, योगायोग होता हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

यासंदर्भात, नरहरी झिरवळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा फोन स्विच ऑफ होता. झिरवळ यांची शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराला हजेरी, हे छायाचित्र समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले. अनेक कार्यकर्त्यांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केले भारतीय जनता पक्षाने (BJP) देखील याबाबत गंभीर दखल घेतली आहे.

दिंडोरी मतदार संघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार उमेदवार आहेत. डॉ पवार यांच्या प्रचार दौऱ्यात सुरुवातीपासून झिरवळ सहभागी आहेत. मात्र निवडणुकीआधी झिरवळ यांचे चिरंजीव गोकुळ यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी उत्सुक असल्याचे कळविले होते. या पार्श्वभूमीवर दिंडोरीत समाज माध्यमांवर कार्यकर्त्यांना चर्चेसाठी एक नवा विषय मिळाला आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Narhari Zirwal politics
Narendra Dabholkar Case : मोठी बातमी! दाभोलकर हत्या प्रकरणातील अंदुरे, कळसकरला जन्मठेप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com