Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : 'शुगर वाढल्याने ऑपरेशन पुढं ढकललं' ; अजित पवारांच्या पूर्णविरामानंतरही शिंदे गटाचा सूचक दावा!

सरकारनामा ब्यूरो

Naresh Mhaske ON Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस ५६ आमदार असतानाही महाविकास आघाडीत फक्त १५ आमदारांच्या गटाच्या नेत्याचा उदोउदो केला जातोय, यामुळेच राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज आहेत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या यांच्या शिवसेना पक्षाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे.

नरेश म्हस्के हे आज माध्यमांशी संवाद साधत होते. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर त्यांनीच पूर्णविराम दिल्यानंतर ही म्हस्के यांनी सूचक वक्तव्य केले आहे. "शुगर वाढल्याने ऑपरेशन पुढे ढकलले गेले," अशी अशी सूचक आणि बोलकी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे. तसेच, ज्या चर्चा सुरु आहेत, त्या गोष्टी पुढे घडतील, यात दुमत नाही, असा ही दावाही म्हस्केंनी केला आहे.

विरोधीपक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत संधान बांधणार असल्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू होती. असे जर का नसते, तर ४० आमदारांना सह्या, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचं रोखठोक सदरातील दावा, याचा दोन दिवस अजित पवारांकडून खंडन केलं गेलं नाही. यावरून तरी हे स्पष्ट आहे की, अजित पवार नाराज आहेत, असा दावा म्हस्केंनी केला आहे.

महाविकास आघाडी वज्रमुठ सभांमध्ये ज्या गटाचे केवळ १५ आमदार उरलेत, त्यांना बसण्यासाठी मोठी खुर्ची दिली जाते, या गोष्टीकडेही म्हस्केंनी लक्ष वेधले . वज्रमुठ सैलमुठ झाले आहे. जळतं तेव्हाच धूर निघत असतो, असे म्हस्के म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT