Sanjay Raut On Ajit Pawar Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी स्वाभिमानातून केली आहे. त्यावेळेपासून पक्ष कधी सत्तेत होता कधी नव्हता. या चढ उताराच्या काळात आम्ही सर्वांनी पक्षवाढीसाठी एकदिलाने काम केले. यापुढेही जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करत राहणार आहे, असे राष्ट्रवादीचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले आहे.
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच राहणार असून, इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही. तसे आता अॅफिडेव्हीट लिहून देऊ का? असे म्हणत, अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
यावेळी अजित पवारांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनाही जोरदार सुनावले होते. राऊतांवर टीका करताना अजित पवार म्हणाले, आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नका, असा जोगदार टोला संजय राऊतांनचं नाव न घेताच अप्रत्यक्षपणे अजित पवार म्हणाले.
यावर आता संजय राऊत यांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले,"आता या चर्चांना पूर्णविराम मिळालं आहे. महाविकास आघाडीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी महाविकास आघाडीला कोणताही तडा जाणार नाही."
संजय राऊत पुढे म्हणाले, " अजित पवारांनी माझ्यावर टिका केली की नाही मला माहित नाही. अजित पवार यांच्याविषयीच्या बदनामीची जी मोहीम सुरू झाली होती, त्याच्यावरती मी भूमिका मांडली होती. जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पाडली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार यांनीही भूमिका घेतली होती. तीच भूमिका आम्ही राष्ट्रवादीच्या बाबतीत घेतली तर त्यात चुकीचं काय? असा उलट प्रश्न असे संजय राऊत यांनी उरस्थित केला.
"आम्ही सगळे महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. महाविकास आघाडी भक्कम राहावी, यासाठी आम्ही चौकीदारी करतो. त्यात अजितदादा पवार सुद्धा आहेत. भाजपची कारस्थानं आमच्याविरोधी रोज होत आहेत, आणि ते उधळणे आमचं काम आहे," असेही संजय राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.