Maharashtra Political Crisis: राज्यात सहा महिन्यापूर्वी सत्तातर झाले. शिवसेनेतून ४० आमदार शिंदे गटात गेल्याने ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) कोसळले. शिवसेनेत फूट पडणार, अशी कुणकुण काही राजकीय नेत्यांना लागली होती. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.
अन् खरी गफलत येथेच झाली..
अजित पवार म्हणाले, "आमदार फुटणार ही महिती उद्धव ठाकरेंना दोन,तीन वेळा दिली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फोन करुन बैठक घेतली होती. पण 'माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे,' असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला तिथेच खरी गफलत झाली,"
तो आमचा पक्षांतर्गंत मामला ..
"या सगळ्या गोष्टी घडून दिल्या गेल्या आहेत. आमदारांना खुशाल जाऊ दिलं गेलं. तिकडे हे व्हायला नको होतं. मी स्वतः उद्धवजींना सावध केलं होतं पण ते बोलले की मी बोलेन, एकनाथ शिंदे यांच्याशी तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे, असं उत्तर त्यांनी दिलं," असे अजित पवार यांनी सांगितले.
भल्या भल्या पहाटे नका म्हणत जाऊ
अडीच वर्षांपूर्वी राजभवनात भल्या पहाटे शपथविधी झाला होता, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावरुन अजित पवार यांना नेहमीच प्रश्न विचारण्यात येतो. यावर " सारखं सारखं भल्या भल्या पहाटे नका म्हणत जाऊ, सकाळी 8 वाजता तो शपथविधी झाला होता. त्यावर मी जास्त बोलणार नाही," असे म्हणत अजित पवार यांनी या विषयावर बोलणं टाळलं.
नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा २९ हजारांनी पराभव झाला आहे. सत्यजीत तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला.
तांबेंना राष्ट्रवादी काँग्रेसची मदत
सत्यजीत तांबे यांच्या विजयावर प्रतिक्रिया देतांना अजित पवार यांनी तांबेंना राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली होती, असे विधान केले आहे. “मविआतल्याही काहींनी सत्यजीतला मदत केली”त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते. त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे,” असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.