Ajit Pawar On NCP  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On NCP : '...तर आम्हीही सुप्रीम कोर्टात गेलो असतो!'; आयोगाच्या निर्णयानंतर अजित पवारांचं मोठं विधान!

NCP News : "लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असतं.."

Chetan Zadpe

Mumbai Political News : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांचा असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. या निकालामुळे पक्षाचे संस्थाप, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो.' (Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले, “लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असतं. निवडणूक आयोगाने आम्हाला आता पक्ष आणि घड्याळ चिन्ह आम्हाला दिलं आहे. आम्ही आणि आमचे सहकारी निर्णय नम्रपणे स्वीकारतो. 50 आमदार आमच्या बाजूने आहेत. बाकी लोकशाहीत कुणालाही कुठेही जाण्याचा अधिकार आहे. जर समजा आयोगातला हा निर्णय आमच्या विरोधात लागला असता तर आम्हीही सर्वोच्च न्यायालयात गेलो असतो,” असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील वर्षी 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. या प्रकरणी अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या प्रकरणी राष्ट्रवादी कुणाची याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT