NCP Crisis: पक्ष अन् चिन्ह अजित पवारांना,पण व्हीपचं काय ?

Election Commission Result On NCP Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना बहाल करण्यात आले आहे.
NCP Crisis News
NCP Crisis NewsSarkarnama
Published on
Updated on

NCP Crisis News : मागील वर्षी 2 जुलै 2023 रोजी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांचा मोठा गट घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले.यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता.या प्रकरणी अजित पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या प्रकरणी राष्ट्रवादी कुणाची याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.

मात्र, आता आगामी निवडणुकींसाठी व्हीप नेमका कोणाचा लागू केला जाणार आणि तो पाळला नाही तर कशाप्रकारे कारवाई केली जाऊ शकते हे देखील पुढे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.

NCP Crisis News
Rohit Pawar On NCP Crisis : केंद्रातील महाशक्तीने पक्ष बळकावला; रोहित पवार भडकले

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना बहाल करण्यात आले आहे. हा शरद पवारांसाठी मोठा धक्का आहे. या निर्णयाचा परिणाम आगामी निवडणुकांवरती होणार आहे. पण दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ज्यांच्याकडे सर्वाधिक आमदार, खासदार आहेत, त्यांना मूळ पक्ष देण्याचा केंद्र निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.

NCP Crisis News
Election Commission On NCP Crisis : ...अन्यथा शरद पवार गटाला अपक्ष म्हणून निवडणुका लढवाव्या लागणार!

निवडणुकीचा मार्ग मोकळा...?

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता अजित पवार गटाचा आगामी निवडणुका लढवण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जी परिस्थिती शिवसेनेची झाली तशीच परिस्थिती राष्ट्रवादीची देखील झाली. ज्यांच्याकडे सर्वाधिक आमदारांनी खासदार आहेत, त्यांना हा मूळ पक्ष देण्याचा केंद्र निवडणूक आयोगाने निर्णय घेतला. मात्र, आता या सगळ्याचे परिणाम आगामी निवडणुकींवरती देखील होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अपात्र निकाल...

केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निकाल दिल्यानंतर आता आमदार अपात्रतेचा निकाल देखील लवकरात लवकर लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या संदर्भातला निर्णय देणार आहेत. मात्र, शिवसेनेची घटना जो महत्त्वाचा मुद्दा शिवसेनेच्या बाबतीत होता. तोच मुद्दा राष्ट्रवादीच्या बाबतीत लागू होत नसल्याचं एकंदरीत चित्र संपूर्ण सुनावणीमध्ये दिसून आलं. त्यामुळे शिवसेनेपेक्षा वेगळा निकाल राष्ट्रवादीचा लागण्याची अपेक्षा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

14 फेब्रुवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या संदर्भातला निकाल देण्याची शक्यता आहे. जशी परिस्थिती शिवसेनेची झाली होती, तीच परिस्थिती राष्ट्रवादीची देखील होणार अशी चर्चा सुरू होती. आणि आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा देखील निर्णय तोच असणार असल्याचं एकंदरीत चित्र दिसत आहे.

व्हीप कोणाचा लागू?

हे वर्ष राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हे वर्ष निवडणुकांचे आहे. या महिन्यात राज्यसभा निवडणूक होणार आहेत आणि या निवडणुकींसाठी आता नेमका व्हीप कोणाचा लागू होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे. राष्ट्रवादी हे नाव आणि पक्ष अजित पवार गटाला दिला आहे. त्यामुळे मूळ राष्ट्रवादी ही अजित पवार (Ajit Pawar) गटाची झाली. मात्र, आता आगामी निवडणुकींसाठी व्हीप नेमका कोणाचा लागू केला जाणार आणि तो वीप पाळला नाही तर कशाप्रकारे कारवाई केली जाऊ शकते हे देखील पुढे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या सगळ्या निर्णयाविरोधात शरद पवार गट आता सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारी दिसून येत आहे. मात्र, आम्हाला हा निर्णय अपेक्षित होता असं शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. येणाऱ्याच्या निवडणुका आहेत. आता त्यासाठी शरद पवार गटाकडून विविध चिन्हांची चाचपणी देखील केली जात आहे. मात्र, जरी हा निकाल आज लागला असला तरी देखील नवीन चिन्हाची चाचपणी अजित पवार हे पक्षातून निघून गेल्यावर शरद पवारांनी शोधण्यास सुरुवात केली होती.

NCP Crisis News
Ncp Crisis : मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ अजितदादांच्या हातात

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com