NCP Party Hearing Result : राष्ट्रवादी पक्ष,घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाची 'ही' होती पहिली प्रतिक्रिया

Sunil Tatkare Reaction : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घ्या नेमकं काय म्हणाले.
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar and Sharad Pawar News : निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत लढाई सुरू होती. अखेर यामध्ये अजित पवार गटाची सरशी झाली. या निकालावर आता विविध प्रतिक्रिया येणं सुरू झालं असून, अजित पवार गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुनील तटकरे म्हणाले, ' मी केवळ खासदार नाही तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहे. निवडणूक आयोगाने भारतीय लोकशाही प्रणालीवर शिक्कामोर्तब केला आहे.'

'मला विश्वास आहे की, अजितदादा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीएमध्ये आणि महाराष्ट्राच्या युतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. लोकशाहीच्या माध्यमातून निर्णय घेत असताना महाराष्ट्रातील जनतेचं समर्थन मिळत आहे. आज त्याला कायदेशीर वैधता आम्हाला मिळाली. याचे आम्हा सर्वांना खूप समाधान आहे.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sunil Tatkare
Ncp Crisis : मोठी बातमी! निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ अजितदादांच्या हातात

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटात पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत लढाई सुरू होती. याबाबत निवडणूक आयोगात ही सुनावणी होती. प्रत्येक सुनावणीला शरद पवार हजर होते. अजित पवार गटाकडून आम्हीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा करण्यात आला होता आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. त्यामुळे शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे गेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे आता अजित पवार असणार आहेत.

पक्षात फूट नाही असं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं होतं आणि बहुमताचा मुद्दा पुढे करण्यात आला होता. त्यावरून निवडणूक आयोगाने आकडेवारी पाहून हा निर्णय दिल्याचं दिसत आहे. एकाप्रकारे ठाकरे आणि शिंदे गटाच्या वादात जो निकाल लागला, तसाच निकाल आता राष्ट्रवादीबाबत लागल्याचे दिसत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Sunil Tatkare
NCP Crisis News : चिन्हाची गरज नाही, आमचा पक्ष शरद पवारच; आयोगाच्या निर्णयानंतर आव्हाडांचा कॉन्फिडन्स!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com