Amit Shah, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : अजितदादांची अमित शाहांसोबत दीड तास चर्चा; आरक्षणाचा मुद्दा की मंत्रिमंडळ विस्तारावर खल?

Ajit Pawar Meeting With Amit Shah In Delhi : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शाहांची भेट घेतल्याने राज्यात वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजितदादा अमित शाहांच्या भेटीत काय चर्चा झाली? याची माहिती आता समोर येत आहे...

Sachin Fulpagare

Maharashtra Politics Latest News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दिल्लीत बैठक झाली. ही बैठक दीड तास चालल्याची माहिती आहे. या वेळी अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही होते. अमित शाहांसोबतच्या बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली? यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत, तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे, तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा दिवाळीपूर्वी होईल, अशी चर्चा होती. दिवाळी सुरू झाली, पण अद्याप मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने अजित पवार गट नाराज असल्याचीही चर्चा आहे. यामुळे या भेटीमागे ही एक पार्श्वभूमी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यात शरद पवार-अजितदादांची भेट

डेंग्यू झाल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बिघडली होती. यामुळे जवळपास दोन आठवडे ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसले नाहीत. पुण्यात दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं. या वेळी शरद पवार यांच्यासह अजित पवारही तिथे आले होते. शरद पवार आणि अजितदादांची तिथे भेट झाली. शरद पवारांनी अजितदादांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बऱ्याच दिवसांनी शरद पवार आणि अजितदादांची भेट झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं.

पुण्यातील पवार कुटुंबाच्या कार्यमक्रमानंतर अजितदादांनी शुक्रवारी थेट दिल्ली गाठली. अजितदादांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे होते. महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. आता आरक्षणावरून मराठा आणि ओबीसी असा वाद पेटलेला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अमित शाहांसोबत अजित पवार यांची बैठक दीड तास चालली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर खल झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या बैठकीत मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावर अजित पवार गटाची अमित शाहांसोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून अमित शाहा लवकरच महायुतीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अमित शाहांच्या बैठकीत राज्यातील राजकीय घडामोडींवर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

अजित पवारांनी अमित शाहांची भेट का घेतली?

- राष्ट्रवादी कुणाची यावर? निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीत अजित पवार गटाचे नकारात्मक मुद्दे समोर येत आहेत. आणि शरद पवार गटाचे दावे प्रभावी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी अमित शाहांसमोर आपली भूमिका स्पष्ट केल्याचं सांगण्यात येत आहे.

- ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेने भाजपची कोंडी होत आहे. आणि त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. यावरही बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांना समान वाटा हवा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. त्यामुळे अमित शाहांसोबत झालेली अजित पवार यांची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT