Ajit pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On NCP : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवारांचा असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. या निकालामुळे पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. या निकालानंतर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय मी नम्रपणे स्वीकारतो.'

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार (Ajit Pawar) आपल्या बहुसंख्य आमदारांसह जुलै २०२३ बाहेर पडले. त्यांनी सत्तेत सहभागी होत मंत्रिपदाची शपथही घेतली. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मीच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचेही अजित पवारांनी जाहीर केले होते. त्यांनी निवडणूक आयोगात कागदपत्रे दाखल करत तसा दावा केला होता. त्यानुसार मंगळवारी निवडणूक आयोगाने बहुमत लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना दिले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर, 'आपण हा निर्णय नम्रपणे स्वीकारतो,' अशी पहिली प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. हा निर्णय घेताना निवडणूक आयोगाने विधानसभेत कोणाचे पारडे जड आहे, हे पाहून निकाल दिला आहे. त्यानुसार पक्ष आणि चिन्ह अजितदादांच्या नावावर गेले आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार (Sharad Pawar) गटाने टीकेची झोड उठवली आहे. हा निर्णय म्हणजे लोकशाहीची हत्या झाल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले. तर शरद पवार गटाचे आक्रमक नेते जितेंद्र आव्हाडांनी शरद पवार हाच आमचा पक्ष आणि चिन्ह असल्याचे सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT