Eknath Shinde, Ajit Pawar News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष आमच्याकडेच असल्याचे स्पष्ट केले. आम्ही घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या भल्याची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) भल्याची आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. त्यानंतर अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ आणि खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेही फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. मात्र, अजित पवारांच्या बैठकीला ते होतेकी नाही, हे स्पष्ट होऊ शकले नाही.
या नेत्यांमध्ये फडणवीसांच्या बंगल्यावर चर्चा झाली. त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार सुनिल तटकरे तर राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी अजित पवार यांची नियुक्ती केल्याची घोषणा केली. तसेच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून नियुक्त्या केल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याच बरोबर अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष आमच्याकडेच आहे, असेही सांगितले.
महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फल्यासाठी आम्ही निर्णय घेतल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही आपण शिवसेनेच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासाठी निर्णय घेतल्याचे सांगतात. त्यामुळे अजित पवार यांनी शिंदे यांच्याच पावलावर पाऊल ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) आहे, अशी भूमिका घेतली होती. तशीच भूमिका अजित पवार आणि सहकाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे फडणवीस यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये ही रणनीती ठरल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीतील हा संघर्ष कुठपर्यंत जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Edited by : Amol Jaybhaye
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.