Nawab Malik News
Nawab Malik NewsSarkarnama

Ajit Pawar News : मोठी बातमी : अजित पवारांनी राज्यपालांना दिलेल्या समर्थकांच्या यादीत नवाब मलिकांचेही नाव?

nawab malik news : राष्ट्रवादी काँग्रेस मधील पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे.
Published on

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस मधील पक्षांमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे आता अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे आता किती आमदार आहेत यासंदर्भात तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. शपथविधीपूर्वी राज्यपालांना देण्यात आलेल्या अजित पवार यांच्या समर्थनातील पत्रामध्ये 25 आमदारांच्या सह्या असून दहा आमदारांची नावे आहेत. या यादीमध्ये नवाब मलिक यांचं देखील नाव असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात भाजपाकडून (BJP) दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधीत व्यक्तीकडून कुर्ला येथील जमीन खरेदी केल्या प्रकरणात आणि त्यामध्ये मनी लॅड्रींग केल्याच्या मलिका यांना अटक करण्यात आली आहे. मलिक हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तसेच न्यायालयाच्या परवानगीने मलिक यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजितदादा यांना पाठिंबा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Nawab Malik News
Ajit Pawar News : रुपाली चाकणकर, सुरज चव्हाण अन् अमोल मिटकरींवर मोठी जबाबदारी

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) मधील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्यातील शिवसेना शिंदे आणि भाजपा युती सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सामील झाले. रविवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्या समर्थनात असलेल्या आठ आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. यापूर्वी राज्यपाल यांना देण्यात आलेल्या समर्थनाच्या पत्रामध्ये 35 आमदारांचे नाव असून 25 आमदारांच्या सह्या असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

अजित पवार यांनी रविवारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही शपथ घेतली. मात्र, यावेळी देण्यात आलेल्या समर्थनाच्या यादीमध्ये नवाब मलिक यांचे नाव असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Nawab Malik News
Sharad Pawar News : अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांचे पवारांनी वाढवले टेन्शन; मला सोडून गेलेले पाच-सहाच...

नवाब मलिक यांची कन्या निलूफर मलिक यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क साधला. त्यांना विचारले की नवाब मलिक यांचे कुटुंब अजितदादा पवार यांच्यासोबत आहे की शरद पवार यांच्यासोबत आहे यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. तसेच हे फक्त नवाब मलिक स्वतः सांगू शकेल असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com