Suresh Dhas- Ajit Pawar-Dhananjay Munde News Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Dhananjay Munde : अजित पवारांनी भाजप आमदार सुरेश धसांच्या आरोपांची दखल घेतली; धनंजय मुंडेंबाबत घेतला मोठा निर्णय

Suresh Dhas Vs Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर राजकीयसह सामाजिक वातावरण तापलेलं असतानाच भाजप आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नवे गंभीर आरोप केले होते.

Deepak Kulkarni

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर राजकीयसह सामाजिक वातावरण तापलेलं असतानाच भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मुंडे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना परळी आणि अंबाजोगाईत काम न करता 73 कोटींची बिलं उचलल्याचा गंभीर आरोप केला होता. आता या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या गंभीर आरोपांची दखल घेतली आहे. अजितदादांनी आता धस यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पक्षांतंर्गत समिती नेमली आहे. यामुळे आता मुंडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी नियुक्त केलेली समिती धनंजय मुंडेंची चौकशी करणार आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमधील हत्याकांडानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या कनेक्शनवरुन सातत्यांन हल्लाबोल केला आहे.यातच त्यांनी अजित पवारांच्या पहिल्याच बीड दौर्याआधी राजकीय वातावरण तापवत मंत्री धनंजय मुंडे टार्गेट केलं होतं.

आमदार धस यांनी परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील घोटाळा बाहेर काढला आहे. मुंडे हेच सामाजिक न्याय तथा बीडचे पालकमंत्री असताना त्यांच्या काळातच परळी आणि अंबाजोगाईत काम न करता बिलं उचलण्यात आल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे. अशी बिले उचलणार्यांवर अजित पवारांनी इतकं प्रेम करू नयेत, असा टोलाहू लगावला होता.

अजित पवारांनी बीडचे पालकमंत्री पद स्विकारल्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीतच त्यांनी भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांना या समितीतून हटवलं होते.पण तरीही या बैठकीला लोकप्रतिनिधी म्हणून सुरेश धस उपस्थित होते. त्यांनी अजित पवार यांना एक पेनड्राईव्ह दिला. यावेळी सभागृहात सन्नाटा झाला.पेन ड्राईव्ह अजितदादांनी घेतला.यात काय असेल, याबाबतचे चर्चांना उधाण आले होते.

सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर 73 कोटी रुपयांचा भष्ट्राचार केल्याचा आरोप केला आहे, याबाबत तो पेन ड्राईव्ह असावा, अशी शक्यता आहे. सामाजिक न्याय मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी 73 कोटी रुपयांची बोगस बिले जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उचलल्याचा थेट आरोप धस यांनी केला होता. हा सर्व प्रकार अजित पवारांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे धस यांनी बुधवारी सांगितले आहे. आज डीटीडीपीची बैठक सुरु होताच धस यांनी अजितदादांकडे हा पेन ड्राईव्ह दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT