
Mumbai News: एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर महायुती सरकारमधील दिवसागणिक वाढत चाललेलं नाराजीनाट्य,मराठा आरक्षणासाठीचा दबाव, बीडमधील सरपंच हत्या प्रकरणांमुळे सरकारची डोकेदुखी वाढलेली आहे. अशातच लाडकी बहीण (CM Ladki Bahin Yojana) योजनमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येत आहे. अशातच आता कोट्यवधींच्या थकबाकीमुळे कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.
राज्य सरकारविरोधात (State Government) आक्रमक पवित्रा घेत राज्यातील 4 लाख कंत्राटदारांनी येत्या 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग,जल जीवन मिशन,नगरविकास,जलसंधारण,ग्रामविकास या विभागांतील सरकारी कामांची अंदाजे तब्ब्ल 89 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं समोर आलेलं आहे.
कंत्राटदार संघटनांनी याबाबतची माहिती उघडकीस आणल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच या थकबाकीसंबंधी राज्य अभियंता व महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अशा दोन्ही संघटनांची मंगळवारी (ता.4) महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यानंतर काम बंद आंदोलनाचा बाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध मोठ्या योजना आणि विकासकामांच्या घोषणा करण्यात आल्या. आमदारांना निवडणुकीत पोषक वातावरण तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधींचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर काही प्रमाणात विकासकामांचा नारळही फोडून कामांना सुरुवातही करण्यात आली होती.
मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेला संबंधित निधीचं वाटप रखडलं असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सरकारी कंत्राटदार संकटात सापडले आहेत. पुढील काही दिवसांत सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
यात धक्कादायक बाब म्हणजे महायुती सरकारमधील सार्वजनिक बांधकाम विभाग - 46 हजार,जलजीवन मिशन - 16 हजार, ग्रामविकास विभाग- 8600 कोटी,जलसंधारण विभाग- 19700 कोटी,नगरविकास विभागांतंर्गत 1700 अशी तब्बल 89 हजार कोटी रुपयांची थकबाकी रखडली आहे. यामुळे थकबाकी संदर्भात लवकरात लवकर मोठा निर्णय घ्यावा लागणार असून नव्या विकासकामांना खो बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.