Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Suryakumar : अजितदादांनी सूर्यकुमारला भरला दम; म्हणाले, ' नाहीतर आम्हीही तुझ्याकडं पाहिलं असतं...'

Vidhan Parishad : सूर्यकुमारने, बरं झालं माझ्या हातात बॉल बसला नाही तर आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला नसता, अशी भावना व्यक्त केली

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील मुंबईतील खेळांडूचा विधान परिषदेत सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित पवार यांनी संघाचे तोंडभरून कौतुक केले.

अजितदादांनी राजकीय फडात टोलेबाजी करतात तशी यावेळी जोरदार बॅटिंग केली. यावेळी त्यांनी सूर्यकुमारला, तू जर तो कॅच सोडला असता तर आम्हीही तुझ्याकडं पाहून घेतलं असतं, अशी मिश्किल टिपण्णी केली.

विधान परिषदेत बोलताना सूर्यकुमार, रोहित शर्माने Rohit Sharma चांगलीच फटकेबाजी केली. यावेळी सूर्यकुमारने, बरं झालं माझ्या हातात बॉल बसला नाही तर आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला नसता, अशी भावना व्यक्त केली. सूर्यकुमारचे ते शब्द पकडून रोहितने आमदारांपुढे जोरदार षटकार लगावला. रोहित म्हणाला, सूर्यकुमार खरंच बरं तु्झ्या हातात बसला नाही तर मी तुला बसवला असता, असा टोला लगावला.

रोहितच्या भाषणाचा धागा पकडून अजितदादांनीही Ajit Pawar सूर्यकुमारची फिरकी घेतली. आपली बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगने हे यश पाहतो आहे. सूर्यकुमारच्या कॅचने गमावलेला समाना खेचून आणला. पण तू जर तो कॅच सोडला असता तर रोहितनेच नाही तर आम्हीही तुझ्याकडे पाहून घेतले असते. आपली लोक जिंकले तर डोक्यावर घेतात आणि हारले तर दगड मारतात, याची जाणीवही अजित पवारांनी करून दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कॅप्टन, अजितदादांचा व्हाईस कॅप्टन, राहुल नार्वेकर, नीलम गोऱ्हे यांचा अम्पायर असा उल्लेख करून सभागृहात जान आणली. मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांचा सत्कार करण्यात आला. तर टीम इंडियासाठी ११ कोटींची मदत जाहीर केली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT