Ajit Pawar : Prakash Ambedkar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On VBA Alliance: राज्यात वंचितची ताकद मोठी; अजित पवारांनी केलं मान्य, म्हणाले, 'माझी हरकत नाही...'

Maharashtra Politics: वंचितच्या समावेशाबद्दल अजित पवारांचा ग्रीन सिग्नल!

सरकारनामा ब्यूरो

MVA News : वंचित बहुजन आघाडी हा शिवसेनेचा मित्र तर झाला मात्र, वंचितचा महाविकास आघाडीचा भाग होऊन, महाविकास आघाडीत वंचितच्या रूपाने चौथ्या मोठ्या गडीची भर पडेल का? याबाबत चर्चा सुरू होती, आता राष्ट्रवादीचे नेते व विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी या विषयी भाष्य करत, वंचितच्या समावेशासाठी सकारात्मकता दर्शवली आहे.

अजित पवार म्हणाले, "प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेनेसोबत आघाडी केली आहे. महाविकास आघाडी टिकावी आणि त्यात बेरीज होण्याकरता जे कोणी असतील त्यांनी यावं, याला कोणाची हरकत असण्याचे कारण नाही. महाविकासआघाडीसाठी अनेक जणांनी प्रयत्न करावे."

"वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्राच मानणारा मोठा वर्ग आहे. महाविकास आघाडी आणि वंचित एकत्र येऊन लढले तर महाराष्ट्रात वेगळं चित्र निर्माण होईल. महाविकास आघाडीत वंचितचा समावेश व्हावा, ही माझी वैयत्तिक इच्छा आहे, महाविकाश आघाडीचे वरिष्ठ आणि घटक पक्ष काय तो निर्णय घेतील," असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी मागील काही दिवसात महाविकास आघाडीच्या विपरीत काही वक्तव्ये केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली होती. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, "महाविकास आघाडीत एकत्रित बोलत असताना, कुणाचा अपमान होणार नाही याची जबाबदारी सर्वांनी घेयला हवी. वंचितचा मविआमध्ये समावेशाबद्दल अजित पवारांची पहिल्यांदाच महत्वाची प्रतिक्रया दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT