Ajit Pawar On Manoj Jarange Jarange  Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar On Jarange : काहीही बोललो तरी खपतं, असं कुणी समजू नये; अजितदादांनी जरांगेंना खडसावलं!

Chetan Zadpe

Mumbai News : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील आता आपल्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळावरुन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईतील शासकीय निवासस्थान सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत. जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अतिशय आणि खळबळजनक आरोप केले आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांना प्रयत्न केला, असाही गंभीर आरोप जरांगेंनी केला यावर आता अजित पवारांनी जरांगेंना इशारा दिला आहे. (Latest Marathi News)

अजित पवार म्हणाले, "राज्याच्या प्रमुखांनी शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. यानंतर सरकार आणि यंत्रणा आरक्षणाच्या कामासाठी सज्ज झाली. आता यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्यक्ती कुणीही असली तरी प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. पण आपण काय बोलतोय कशाबद्दल बोलतोय याचं भान राखलं पाहिजे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राज्याची कायदा सुव्यवस्था राखावी असा आमचा. दोन वेळा आरक्षण देण्याचा प्रयत्न केल, पण कोर्टात टिकलं नाही. त्यामुळे आता बारकाईने आणि कसलीही त्रुटी न राहता आता आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. मात्र आज जाणीवपूर्वक काही वक्तव्ये केली जात आहेत . मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते. कुणी असं समजू नये की काहीही बोललो तरी खपतं, असं होणार नाही," असा इशारा अजित पवारांनी जरांगेंना दिला.

सागर बंगल्याकडे रवाना -

दरम्यान, जरांगेंच्या भावनांचा मोठा उद्रेक झाला. हे ओळखून तेथे उपस्थित समाजबांधवांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पाटील.. पाटील शांत राहा. दादा.. दादा स्वतःला सांभाळा. पाटील आम्हाला तुम्ही हवे आहेत, आरक्षण नंतर. आपण जाऊ पण आधी उपोषणामुळे तब्येतीची काळजी घेऊ, अशी आर्जव करण्यात आली. मात्र जरांगे पाटील कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी तडक व्यासपीठ सोडले आणि मुंबईतील फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) शासकीय निवासस्थानाकडे रवाना झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT