Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar News : अजित पवार ठरविणार राष्ट्रवादीची निवडणूक रणनीती; म्हणूनच मागितले संघटनेतील पद

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar Demands For Position in Party : मुंबईत बुधवारी (ता. २०) राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा झाला. यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनचा आढावा घेतला. दरम्यान, अजित पवार यांच्या एका मागणीने हा सोहळा चांगलाच चर्चेत आला आहे. यावेळी त्यांनी पक्षात कुठलेही पद द्या, त्याला न्याय मिळवून देईन असे स्पष्टपणे सांगितले. स्वतः शरद पवार यांच्यापुढे अजितदादांनी घेतलेल्या या स्पष्ट भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी घेतला होता. त्यावेळी पक्षातील सर्वच नेत्यांनी पवारांच्याच नेतृत्वात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पक्षातील कार्यकर्त्यांचा आग्रह पाहून पवार यांनी आपला निर्णय मागे घेतला. त्यावेळी त्यांनी पक्षात मात्र भाकरी फिरवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार दिल्लीतील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांनाही काही जाबाबदाऱ्या दिल्या.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना मात्र पक्षांतर्गत कुठलीही जबाबदारी दिली नाही. त्यामुळे अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. मुंबईतील कार्यक्रमात मात्र अजित पवार यांनी आपल्याला पक्षांतर्गत जाबाबदारी हवी असल्याचे स्पष्टच सांगून टाकले. त्यावेळी त्यांनी जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यकाळाचाही उल्लेख केला. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पाच वर्षे एक महिना पूर्ण झाला आहे. तसेच पक्षात सध्या इतर कुठलेही पद रिक्त नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळातील निवडणुका अजित पवार यांच्या नेतृत्वात लढवण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महाविकास आघाडीत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ आहे. आगामी विधानसभा अजित पवार यांच्या नेतृत्वात लढवली तर राष्ट्रवादीकडून मोठा पक्ष होण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील. यानुसार ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री या महाविकास आघाडीतील नियमानुसार अजित पवार मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची वारंवार इच्छ व्यक्त केली आहे. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी अजित पवार सर्वोतोपरी प्रयत्न करतील, असेही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT