Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) दोनदिवसीय शिबिराचे आयोजन कर्जत या ठिकाणी करण्यात आले होते. शिबिराचा आज दुसरा दिवस होता. यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहिले होते. या शिबिरात भाषण करताना अजित पवारांनी अध्यक्ष शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत आणि सत्तेत सहभागी होण्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. (Latest Marathi News)
अजित पवार म्हणाले, "सातत्याने आम्हाला गाफील ठेवण्यात आलं. आम्ही दहा बारा जण पक्षाचे नेते देवगिरी बंगल्यावर उपस्थित होतो. थेट साहेबांना (शरद पवार) सांगण्याऐवजी, आम्ही सुप्रिया सुळेंना घरी बोलावलं. आम्ही सगळे इथे बसलो आहोत, असं काहीच सुप्रियांना आधी सांगितलं नव्हतं. सुप्रिया आल्यानंतर त्यांना सांगितलं की, लोकशाहीत बहुमताला आधार द्यावा लागतो. तरच संघटना पुढे जाते, असं सांगितल्यावर सुप्रिया म्हणाल्या मला सात दिवस द्या. मी साहेबांना यासाठी समजावते, माझ्यावर सगळं सोपवा. आम्ही दहा दिवस थांबलो. यामध्ये जयंत पाटील, अनिल देशमुख हेसुद्धा होते. पुन्हा आम्ही चर्चा केली की, सरकारमध्ये गेलं पाहिजे."
अजित पवार म्हणाले, "यानंतर आम्ही थेट साहेबांकडे गेलो. साहेबांनी सर्व ऐकून घेतलं. त्यानंतर साहेबांनी (शरद पवार) सांगितलं तुम्ही सरकारमध्ये जा, मी इकडे अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. त्यांनी राजीनामा दिला आणि लगेच 15 जणांची कमिटी स्थापन केली. ही 15 नावं दिल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले. राजीनाम्यानंतर पुन्हा पक्षाच्या महिला आघाडीला सांगितलं की, राजीनामा परत घेण्यासाठी आंदोलनं करा. मला कळलंच नाही, असं का? जर राजीनामा नव्हता द्यायचा तर आधी का दिला?
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.