Akshay Shinde and Brijbhushan singh.jpeg Sarkarnama
मुंबई

Akshay Shinde Encounter: 'एन्काऊंटर करायचाच होता तर ब्रिजभूषण यांचा का केला नाही...?'; काँग्रेस नेत्याचा जिव्हारी लागणारा घाव

Mahavikas Aaghadi Vs Mahayuti : महाराष्ट्र बिहार आणि युपीच्या पुढे जाताना दिसून येत आहे. कायद्याचं संरक्षण करणार्‍यांनी कायद्याच्या चौकटीतच राहायला पाहिजे. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली होती.

Deepak Kulkarni

Mumbai News : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर केला. या एन्काऊंटरमुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. एकीकडे या एन्काऊंटरवरुन पोलिसांवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र, विरोधकांकडून पोलिसांच्या या कारवाईवर शंका घेतली जात आहे. अशातच आता बदलापूर एन्काऊंटरवरुन काँग्रेसच्या नेत्याने एक धक्कादायक विधान केलं आहे.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसची धडाडती तोफ विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी बदलापूर प्रकरणावरुन महायुती सरकारवर हल्लाबोल करताना भाजपच्या जिव्हारी लागणारा घाव घातला आहे.ते म्हणाले, जर एन्काऊंटर करायचाच होता, तर ब्रिजभूषण सिंह यांचा का केला नाही? त्यांनी किती तरुणींचा विनयभंग केला, मग या त्रिकुटाने का मागणी केली नाही? असा घणाघातही त्यांनी केला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष जे आरोपी आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का असा खडासवालही उपस्थित केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व आपटे नाही, मात्र जे आरोपी आपटे आहेत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? चाईल्ड तस्करी आणि पोर्नोग्राफीचं रॅकेट समोर येईल.या शाळेतील एक मुलगी गायब झाली आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केला.

या प्रकरणात आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून एन्काऊंटरनंतर पेपरला जाहिराती दिल्या आहेत. याचा अर्थ मुख्यमंत्री (Chief Minister) यांच्या आदेशाने ही एन्काऊंटर झाला का? अशी विचारणा त्यांनी केली. कोणी मुख्यमंत्री तर कोणी उपमुख्यमंत्री याच समर्थन करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

बुरखा आणि हातकडी असताना तो फायर करतो.पोलिसांच्या बंदूकीला लॉक असतो.त्या कैद्याच्या हाताला बेडी असते. कैद्याला ने- आण करण्याचं काम कधीही गुन्हे शाखेचे नसते, या अधिकाऱ्याचा मागील इतिहास वेगळा आहे. ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आहेत ते घरात मजा मारत आहेत.ते भाजप आणि आरएसएस संबंधित आहेत.त्यांना वाचवण्याचं काम सरकार करत असल्याची टीका त्यांनी केली.

'रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करा..'

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील पोलिस प्रशासनाच्या प्रमुख पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांविरोधात आक्रमक झालेत. पटोले म्हणाले, 'रश्मी शुक्ला यांची वादग्रस्त पार्श्वभूमी पाहता, आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका विष्पक्ष वातावरणात होण्यासाठी त्यांची तात्काळ हकालपट्टी करा', अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप...

भारताचे कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह काही कुस्तीपटूंनी भाजपचे माजी खासदार आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले होते. याबाबत याचिकाही दाखल केली होती. यामध्ये भारताच्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध आवाज उठवत कारवाईची मागणी केली होती. ब्रिजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण सारखे गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT