Ambarnath Nagar Parishad Result  sarkarnama
मुंबई

Ambarnath Nagar Parishad Result : एकनाथ शिंदेंना पराभवाची धूळ, अंबरनाथ नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा; तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

BJP Vs Shivsena Eknath Shinde : मतदारांनी भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांना कौल देत नगराध्यक्ष पदावर मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे.

शर्मिला वाळुंज

Ambarnath News : अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत थेट सामना झाला होता. शिवसेनेकडून मनीषा वाडेकर, तर भाजपकडून तेजश्री करंजुळे यांच्यात अटीतटीची लढत झाली.मात्र, तेजश्री यांनी विजय मिळवला.

या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. अंबरनाथ नगरपरिषदेत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जाहीर सभा झाल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

मतदारांनी भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांना कौल देत नगराध्यक्ष पदावर मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. दरम्यान या विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांनी जल्लोष करत विजय सादरा केला.

बदलापूरही गमावले

बदलापूर नगरपंचायतीमध्ये देखील शिंदेंना धक्का बसला आहे. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी तब्बल ७ हजार ६३४ मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT