Beed Election Results : बीडमध्ये 'घड्याळाची टिकटिक', गेवराईत शतप्रतिशत भाजप; माजलगावात 'तुतारीचा आवाज'! बीडमधील सविस्तर निकाल एका क्लिकवर!

Beed municipal election results 2025 : बीड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक निकाल जाहीर झाले असून गेवराईत भाजपने शतप्रतिशत विजय मिळवला, माजलगावात तुतारीचा आवाज तर परळी व अंबाजोगाईत महायुती अबाधित राहिली.
Maharashtra Election
Maharashtra ElectionSarkarnama
Published on
Updated on

Municipal Corpoeration News : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बीडसह जिल्ह्यातील नगरपालिकांचा कौल स्पष्ट झाला आहे. गेवराईतील पंडित विरुद्ध पवार संघर्षात मतदारांनी शतप्रतिशत भाजपच्या बाजूने निकाल दिला. नगराध्यक्षपदासह सर्वाधिक जागेसह पवारांनी सत्ता राखली. तर बीडमध्ये अजित पवार यांच्या बारामती-पिंपरी चिंचवड विकासाच्या मॉडेलवर विश्वास दाखवत बीडकरांनी घड्याळाच्या टिकटिकला पसंती दर्शवली. परळी, अंबाजोगाईत महायुतीने वर्चस्व सिद्ध केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगावमध्ये मात्र तुतारी वाजली आहे.

बीडमध्ये शहराला बकाल करणाऱ्या क्षीरसागरांच्या 35 वर्षांच्या सत्तेला अखेर सुरूंग लावला आहे. इकडून तिकडे उड्या मारत सता राखण्याचे प्रयत्न अखेर फोल ठरवत नागरिकांनी अजित पवारांच्या विकास करणाऱ्याला निवडून द्या, या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. बीड, माजलगांवमध्ये भाजपच्या हिंदुत्वाचा प्रयोग फसल्याचेही निकालावरून दिसून आले आहे. अंबाजोगाईत भाजपने केलेला आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. इथे राजकिशोर मोदींची 25 वर्षांची सत्ता गेली. पण त्यांचे 31 पैकी 20 नगरसेवक विजयी झाले आहेत.

Maharashtra Election
Bhumre father son politics : बाप-लेकाची 'पॉवर' जोरात! 'भुमरे फॅक्टर'समोर ठाकरेंचा शिलेदार दत्ता गोर्डेंना सलग दुसरा धक्का

बहिण-भावाची युती परळीकरांनी स्वीकारली..

तिकडे परळीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंच्या गोटातील दिपक देशमुखसारखा मोहरा फोडला होता. निवडणुकीती आरोप-प्रत्यारोपानंतर परळीत काही धक्कादायक निकाल लागतो का? अशीही चर्चा सुरू होती. पण ती परळीकरांनी फोल ठरवली. धनंजय मुंडे-पंकजा मुंडे या बहिण-भावांची महायुती इथे प्रभावी ठरली. या निमित्ताने धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादीने इथे सत्ता राखली आहे. धारुरमधील भाजपची सत्ता उलटविण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे.

जिल्ह्यात महायुतीने घवघवीत यश मिळविले असले तरी सहा पैकी सर्वात मोठी बीड, परळी आणि धारुर नगर पालिका जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार मुंसडी मारली आहे. गेवराईत भाजप तर अंबाजोगाईत भाजप पुरस्कृत आघाडीला विजय मिळाला. माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नगराध्यक्ष झाला.

बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दलित - मुस्लिम (पारवेंचे जावई शेख मुजिब मुस्लिम) प्रयोग केला आणि निकालात याला यश मिळाले. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमलता पारवे विजयी झाल्या. भाजपने या ठिकाणी 'हिंदुत्व'चा प्रयोग केला मात्र, तो फसला. या ठिकाणी राष्ट्रवादीने सर्वाधिक 19 नगरसेवक आणि नगराध्यक्षपद जिंकले. गेवराईत भाजपने सत्ता राखण्यात यश मिळविले. गिता पवार नगराध्यक्षपदी निवडुण आल्या. धारुरमध्ये भाजपची सत्ता पालटण्यात आमदार प्रकाश सोळंके यांना यश आले. येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाभऊ जाधव नगराध्यक्षपदावर विजयी झाले.

Maharashtra Election
Parbhani News : परभणीत महायुतीचा बोलबाला; पण भाजपचं मोठा भाऊ! मेघना बोर्डीकरांची खेळी यशस्वी..

परळीत महायुतीने विजय मिळविला असून राष्ट्रवादीच्या पद्मश्री धर्माधिकारी नगराध्यक्षपदावर विजयी झाल्या. अंबाजोगाईत मुस्लिमांची मते पदरात पाडून घेण्यासाठी भाजपने आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनेही येथे आघाड्या केल्या. या ठिकाणी भाजपचा प्रयोग यशस्वी झाला आणि आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांनी राष्ट्रवादीच्या राजकिशोर मोदी यांची 25 वर्षांची नगर पालिकेवरील सत्ता उलटवली. माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी तिरंगी लढत झाली. येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिफा बिलाल चाऊस नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com