Eknath Shinde News : अंबरनाथ मधील राजकीय वातावरण तापले आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना हा येथील सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला पराभूत केले होते. भाजपच्या तेजश्री करंजुळे-पाटील या नगराध्यक्ष आहेत.
दरम्यान आज, अंबरनाथच्या नगराध्यक्ष तेजस्वी करंजुळे सर्व भाजपा नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेले आहेत. ठाण्यातील बंगल्यावर ते शिंदेंची भेट घेणार आहेत, त्यामुळे मोठा राजकीय उलटफेर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अंबरनाथमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष आहे. मात्र, शिवसेनेचे संख्याबळ जास्त आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ही शिवसेने सोबत आहेत.त्यामुळे अंबरनाथ मध्ये गेल्या काही दिवसांपासून सत्ता बदल चर्चांना जोर धरला होता. त्यातच भाजपचे सर्व नगरसेवक शिंदेंच्या भेटीला गेल्याने नेमकी भेट कशासाठी याची चर्चा आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या 23 जागांवर विजय मिळवला. तर भाजपने ११ जागा, काँग्रेस १२ जागा आणि अजित पवाराच्या राष्ट्रवादीने ४ जागांवर विजय मिळावल्या होत्या. दरम्यान, काँग्रेसच्या नगरसेवकांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यातील 10 जणांना निलंबित करण्यात आले होते. त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.