Eknath Shinde News: एकनाथ शिंदेंचा संताप; ठाणे महापालिकेचे 3 अधिकारी तडकाफडकी निलंबित, 2 अधिकार्‍यांवर कारवाईची टांगती तलवार

Thane Municipal Corporation Action: ठाण्यात यंदाच्या नवरात्रोत्सवातील देवीमूर्ती विसर्जन व्यवस्थेमध्ये महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका हा शहरातील भाविक तसेच सार्वजनिक मंडळांना बसला. यावरून स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
Eknath Shinde Thane Corporation
Eknath Shinde Thane Corporation sarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News: ठाण्यात यंदाच्या नवरात्रोत्सवातील देवीमूर्ती विसर्जन व्यवस्थेमध्ये महानगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका हा शहरातील भाविक तसेच सार्वजनिक मंडळांना बसला. यावरून स्वत: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महापालिका प्रशासनानं गणेश विसर्जनाच्या बाबतीत दाखवलेली तयारी, तत्परता नवरात्रोत्सवाच्या विसर्जनावेळी दिसून आली नाही. याच पार्श्वभूमीवर आता ठाणे महानगरपालिकेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या तीव्र नाराजीनंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनानं शुक्रवारी(ता.23 ऑक्टोबर) कठोर कारवाई केली आहे. महापालिका आयुक्तांनी 3 अधिकार्‍यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच इतर 2 अधिकाऱ्यांना कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावली आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या नवरात्रौत्सव काळातील देवीमूर्ती विसर्जन व्यवस्थेतील त्रुटी आणि अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा समोर आला होता. अखेर प्रशासनानं नागरिकांना या ढिसाळ नियोजनामुळे सहन कराव्या लागलेल्या मनस्तापानंतर मोठी कारवाई केली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या संतापानंतर पालिका प्रशासनानं तत्काळ कारवाईचा बडगा उचलत दोषींना दणका दिला आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिका (TMC) प्रशासनाने विसर्जनासाठी कृत्रिम तलाव आणि विसर्जन घाटांची व्यवस्था केली होती. परंतु, प्रत्यक्ष विसर्जनाच्या दिवशी समन्वयाचा मोठा अभाव दिसून आला होता.

Eknath Shinde Thane Corporation
MNS News: दुष्काळाचं भीषण संकट..! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मोठा निर्णय, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार; मनसैनिकांना दिले महत्त्वाचे आदेश

ठाणे शहरातील तलाव प्रदूषित होऊ नये म्हणून पालिकेने कृत्रिम विसर्जन हौदांची निर्मिती केली होती. मात्र,शहरातील वाढत्या गर्दीच्या तुलनेत हे पालिकेकडून व्यवस्था करण्यात आलेल्या या विसर्जन हौदांची संख्या अपुरी पडली पडल्याचं दिसून आलं होतं. तसेच अनेक ठिकाणी विसर्जन हौद वेळेत स्वच्छ न केल्यानं अस्वच्छ पाण्यातच मूर्तींचं विसर्जन केल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या होत्या.

शहरातील अनेक प्रमुख विसर्जन मार्ग आणि घाटांवर पथदिवे बंद असल्यामुळे अंधार दिसून आला होता. जनरेटरची पुरेशी पर्यायी व्यवस्था न केल्यानं रात्रीच्या वेळी विसर्जन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचंही समोर आलं होतं. तसेच विसर्जनस्थळी गर्दी नियंत्रित करण्यासाठी महापालिका तसेच पोलिस कर्मचारी किंवा स्वयंसेवक उपस्थित नसल्याचंही पाहायला मिळालं होतं.

Eknath Shinde Thane Corporation
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा ‘टायमिंग’ संशयास्पद? जरांगेंचा रामदास कदमांना थेट सवाल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com