Eknath Shinde Politics : 'पुणे शिक्षक'मध्ये मोठा ट्विस्ट, शिंदेंची शिवसेना बंडखोराच्या विजयासाठी लावणार ताकद? मध्यरात्री खलबतं

Eknath Shinde Pune Teachers MLC Election : मध्यरात्री एकनाथ शिंदेंचे निवासस्थान येथे बैठक झाली. या बैठकीत शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचा आढावा घेण्यात आला.
Eknath Shinde Pune Teachers MLC Election
Eknath Shinde Pune Teachers MLC ElectionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Shinde Pune MLC Election News : पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे कौस्तुभ गावडे हे शिक्षक मतदारसंघातून लढत आहे. शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेले मंगशे चिवटे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. दरम्यान, आता गावडे यांच्या विरोधात बंडखोरी करणारे अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून ताकद दिली जात असल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी विधान परिषद निवडणुकीबाबत मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत खलबतं झाली. या बैठकीत बंडखोर अपक्ष उमेदवार सचिन सानप उपस्थित होते.

सानप हे मंत्री उदय सामंत यांचे एसडीओ देखील होते. दरम्यान, या बैठकीत प्रामुख्याने सानप यांच्या उमेदवारीवर चर्चा झाल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे. राजकीय वर्तुळात बैठकीमध्ये सचिन सानप यांच्या विजयाची रणनीती ठरल्याची आणि त्यासाठी तयारी झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र, बैठकीत शिंदेंनी युती धर्म पाळा, असे सांगितल्याचे बोलले जात आहे.

या बैठकीला रवींद्र धंगेकर उपस्थित होते. ते म्हणाले, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, आमदार, खासदार, माजी आमदार सर्वांची बैठक शिंदेंसाहेबांनी नंदनवन येथे घेतली. बैठकीत पक्षाची चर्चा झाली की येणाऱ्या निवडणुकीत कसं काम करायचे.

Eknath Shinde Pune Teachers MLC Election
MLC Election Voting Rules : पदवीधर निवडणुकीत असे करा मतदान, अन्यथा तुमचे मत ठरेल बाद!

शिंदे अंतिन निर्णय घेणार

चर्चेमध्ये शिक्षक मतदारसंघाबाबत नाव येत होती. मात्र, शिदेंसाहेबांनी सर्व माहिती घेतली. अंतिम निर्णय तेच घेतील, असे देखील धंगेकर यांनी सांगितले. सानप काल नंदनवनला होते मात्र ते बैठकीत नव्हते, असे देखील धंगेकर यांनी सांगितले.

माझ मत हे पक्षाचे मत होत नाही. मात्र, माझं मत आहे की पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे. पक्षाचे जो अंतिम निर्णय होईल तो मान्य आहे. शिंदेसाहेब जो निर्णय देतील तो सगळ्यांना बंधनकारक आहे, असे देखील धंगेकर म्हणाले. दरम्यान, एका वृत्तावाहिनीशी बोलताना दरम्यान, सचिन सानप म्हणाले, आपण अपक्ष लढत असून पाठींब्यासाठी भेटीगाठी घेत आहे. मी एकनाथ शिंदेसाहेबांच्या निर्णयाची वाट पाहतोय.

Eknath Shinde Pune Teachers MLC Election
MLC Election : एकनाथ शिंदेंच्या शिक्षक सेनेने भाजपला घेरलं; तब्बल 10 हजार 500 शिक्षक मतदानापासून दूर राहणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com