Eknath Shinde BJP sarkarnama
मुंबई

Ambernath Tender Dispute : टेंडरवरून भाजप-शिवसेनेत वादाची ठिणगी? नगराध्यक्षांचे एकनाथ शिंदेंच्या भेटीमागचे कारण समोर

BJP Eknath Shinde Shiv Sena : भाजपच्या नगरसेवकांसोबत नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी एकनाथ शिंदेंच्यी ठाण्यात भेट घेतली होती. या भेटीचे कारण आता समोर आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

BJP News : अंबरनाथ नगर परिषदेत बिलो टेंडरमुळे विकासकामे रखडण्याची शक्यता असल्याच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटात मतभेद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी भाजपच्या नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी भाजपच्या नगरसेवकांसोबत नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी एकनाथ शिंदेंच्यी ठाण्यात भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. मात्र, या भेटीबाबत कल्याण जिल्हा भाजप अध्यक्ष नंदकिशोर परब यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले, नगर परिषदेत काही कामांसाठी बिलो टेंडर भरले जात असल्याने संबंधित कामे वेळेत पूर्ण होण्याबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. कामे पूर्ण झाली नाहीत, तर त्याचे खापर भाजपच्या नगराध्यक्षांवर आणि भाजपवर फोडले जाऊ शकते. त्यामुळे या विषयावर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांनी भाजप नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

दरम्यान, बिलो टेंडर भरणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेतील काही व्यक्तींचाही समावेश असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अंबरनाथ नगर परिषदेत बिलो टेंडरचा मुद्दा आता केवळ विकासकामांपुरता मर्यादित न राहता भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील राजकीय संघर्षाचे कारण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT