Eknath shinde News : एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता तर 106 आमदार असूनही घरी बसले असते; दरेकरांना शिवसेनेच्या बड्या नेत्याने डिवचले

Manoj Jarange’s viral audio clip News : आरे आणि कारेची भाषा ही मुळात शिवसेनेची आहे. एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांना वेगळे करण्याचे हे षडयंत्र दिसत आहे.
pravin darekar, ekanth shinde
pravin darekar, ekanth shindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी ऑडिओ बॉम्ब फोडला. त्यामुळे राज्याचे राजकारण 360 डिग्रीमध्ये ढवळून निघाले आहे. जरांगे पाटील यांनी बॉम्ब फोडताच महायुतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडताच भाजपकडूनही प्रविण दरेकर, प्रसाद लाड व मंत्री नितेश राणे यांनी आरोप केले आहेत. त्यामुळे दोन पक्षातील नेत्याकडून केलेल्या आरोप-प्रत्यारोपवरून वातावरण तापले असतानाच आता या वादात शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी उडी घेतली आहे. त्यांनी भाजपवर निशाणा साधताना एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपला 106 आमदार असूनही घरी बसावे लागले असते, असे भाजपच्या जिव्हारी लागणारे वक्तव्य करून प्रविण दरेकर यांना डिवचले आहे.

प्रसार माध्यमाशी संवाद साधताना आमदार संजय गायकवाड यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम काय चुकीचे बोलले? रामदास कदम यांनी जर आरोप केले तर तुम्हाला काय म्हणायची गरज आहे? त्या ऑडिओ क्लिपमध्ये तुमच्या पक्षाचे आमदार तुमचे कार्यकर्ते यांचा आवाज स्पष्टपणे दिसतो आहे. यावर तुम्ही स्पष्टीकरण करा की तुम्ही काय बोलताय याचे आधी आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रामध्ये इतक्या घटना घडल्या की, शिवसेनेच्या मंत्र्याला मारहाण झाली, कारवाई झाली नाही. शिवसेनेच्या आमदारावर गुन्हे दाखल झाले हे महाराष्ट्र पाहत नाही का? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित करीत भाजप नेत्यांना चांगलेच धारेवर धरले.

आरे आणि कारेची भाषा ही मुळात शिवसेनेची (Shivsena) आहे. एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांना वेगळे करण्याचे हे षडयंत्र दिसत आहे. कुठेतरी सांगायचे की भाजपमुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण एकनाथ शिंदे आणि उठाव केला नसता तर भाजपचे 106 आमदार असूनही ते घरी बसले असते. ज्या 236 जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या त्या फक्त एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे केला म्हणून त्या निवडून आल्या आहेत, असे प्रवीण दरेकरांच्या विधानावर बोलताना आमदार गायकवाड यांनी निशाणा साधला.

pravin darekar, ekanth shinde
BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

या संपूर्ण प्रकरणाची सीएम फडणवीस यांनी सखोल चौकशी केली पाहिजे. शिवसेनेचा आवाज कोणीच दाबू शकत नाही. ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची संघटना आहे. आरोप करताना आधी विचार केला पाहिजे आणि वरिष्ठांशी चर्चा केली पाहिजे. एकनाथ शिंदे सुसंस्कृत संयमी, शांत आहेत. ते उत्तर देणार नाहीत पण आम्ही मात्र याला उत्तर देऊ, असेही त्यांनी स्प्ष्ट केले.

pravin darekar, ekanth shinde
BMC Budget : सर्वात श्रीमंत महापालिका, बजेटचा आकडे ऐकूण बसले धक्का; 'ही' राज्य आसपासही नाहीत!

मनोज जरांगे यांनी जे मोर्चे काढले आणि जे दहा टक्के आरक्षण दिले ते एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि दसऱ्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर डोके ठेवून सांगितलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण देईन. यामध्ये इतर कोणाचा सहभाग आहे हे मला माहित नाही. रामदास कदम हाडाचे शिवसैनिक आहेत. त्यांनी शिवसेना पक्ष वाढवला आहे, असे संजय गायकवाडांनी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com