

Mumbai News : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संयुक्त अशी शिवाजी पार्कवर प्रचार सभा घेतली. या सभेत ठाकरे बंधूंनी आपल्या टीकेचा रोख भाजपवर ठेवत जोरदार आणि घणाघाती टीका केली. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत लाव रे तो व्हिडिओ म्हणत जे चाललंय ते बघितलं की निवडणुकी न लढवलेली बरं आता भीती वाटतं असल्याचे म्हटलं आहे. तर उद्धव ठाकरे यांनी अदानीकरण चाललंय, असा टोला लगावला आहे. तर याच सभेच दोन्ही बंधूंनी अजित पवार, अकोटमधील भाजपची युती आणि बदलापूरात दिलेली उमेदवारीवरून भाजपला पुन्हा एकदा घेरलं आहे.
शिवाजी पार्कवर आयोजित सभेत राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत व्हिडिओ लावत देशात, राज्यात आणि मुंबईला लागून कशा पद्धतीने अदानी समुह वाढत आहे याचे स्पष्टीकरण दिले. यावेळी त्यांनी, मुंबई विकायला काढली असून देश देखील विकायला काढला आहे. २०२४ मध्ये एक व्यक्ती भेटली ज्याने लोकसभेनंतर मला देशात चाललेलं सत्य सांगितलं त्यानंतरच मी माझ्या टीमला कामाला लावलं आणि रिसर् केला. जे आता समोर येत आहे त्यामुळे आता भीती वाटतेय की देशात निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या.
ज्यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले. त्या 2014 ते आज 2024 पर्यंतच्या फक्त 10 वर्षांत जे घडलं त्यामुळे धक्काच बसला आहे. आपण बघत नाही, फक्त डोळे झाक करतो. मात्र जर का कोणत्या एखाद्या हिंदी इंग्रजी टेलिव्हिजन चॅनलने बोललं तर वरून दट्ट्या येतो. जाहिराती बंद करण्याची धमकी येते टेलिव्हिजन चॅनल ब्लॉक केलं जातंय, असे म्हणत त्यांनी गौतम अदानी 2014 ला कुठे होते? आणि २०२४-२५ ला कुठं आहेत? ते दाखवलं. तसेच फक्त सरकारच्या आशीर्वादानेच हे होत असल्याचा आरोप केला आहे.
याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपवर सडकून टीका केली असून हे सगळं अदानीकरण चाललं असून आमची मुंबई, मुंबादेवीच्या नावावरून तिचं नाव मुंबई ठेवलीय. पण आता मुंबईचं परत बॉम्बे करण्याचा डाव त्यांच्या मनात असल्याचा घणाघात केला आहे. तसेच यावेळी त्यांनी अन्नामलाई आला त्याला आपण धन्यवाद देत असून त्या रसमलईमुळेच भाजपचा खरा चेहरा आता समोर आला आहे. आत्ताच काय तर याआधी लोकसभेवेळी त्यांनी जो नारा दिला अबकी बार 400 पार त्याचाही बुरखा त्यांच्याच नेत्याने फाडला होता. त्याने त्यांना संविधान बदलायचे असल्याचे म्हटले होते, असे म्हटलं आहे.
लाथ मारा...
तसेच यावेळी अजित पवार आणि छगन भुजबळ यांचे नाव घेत फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. एकीकडे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, मुख्यमंत्री असताना त्यांना तुरुंगात टाकलं (भुजबळ) आणि आता मांडीला मांडी लावून बसले आहेत. तर दुसरीकडे अजित पवारांचे बैलगाडीभरून पुरावे नेले. पण आता काय सांगतायत की कोर्टात केस सुरू आहे. पुरावे असतील तर अटक होईल. तुम्हीच पुरावे दिले होते ते द्या आता कोर्टात, असेही आव्हान त्यांनी दिले आहे.
तर उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून फडणवीस यांना घेरताना, अजित पवारांवर आरोप करताना तुम्ही ढिगभर पुरावे दिले. आता ते पुरावे की जाळावे हे तुम्हीच सांगा. त्या पुराव्यात दम आहे की नाही ते ही सांगा. पुराव्यात दम असेल अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या आणि नसेल तर अजित पवारांची माफी मागा असेही त्यांनी सुनावले आहे.
युतीवरून बोचरी टीका
याचवेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीवरून बोचरी टीका करणाऱ्या भाजप आणि फडणवीस यांना सुनावत अकोटमधील काँग्रेस आणि एमआयएमशी केलेल्या युतीचा समाचार घेतला आहे. अकोटमध्ये एमआयएमसोबत आणि अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेससोबत युती केलीय. ६६ जागा बिनविरोध केल्या. आज ६६ आहेत, उद्या आकडे वाढत जातील. त्यांना कळलंय की आपण लोकांना कसं विकत घेतोय.
वाईट हे वाटतं की आपण विकले जातोय. ड्रग्ज विकणाऱ्याला भाजपनं तिकीट दिलंय. तेही तुमच्या नाकावर टिच्चून. तसेच बदलापूरमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यातला आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. एवढी हिंमत आली कुठून असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी जेव्हा आपण काँग्रेसशी युती केली तेंव्हा मी हिंदुत्व सोडलं अशी टीका केली. पण आता फडणवीस यांनी काय सोडलं? त्यामुळे आता त्यांनी केलं ते आमर प्रेम आणि आम्ही केलं की लव जिहाद असं का? असाही सवाल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.