Amit Shah Sarkarnama
मुंबई

Amit Shah : अमित शाहांचं सर्वात धक्कादायक विधान, म्हणाले, महायुती सरकार नसतं,तर मुंबई राहण्यासारखी राहिली नसती!'

Amit Shah Ghatkopar Sabha News : भाजप नेते अमित शाह यांनी आपल्या भाषणात ट्रिपल तलाकवरही भाष्य केलं. ते म्हणाले, ट्रिपल तलाक हटवून चांगले केले की नाही.तेव्हा सगळे लोक विरोध करत होते.त्यांचं कामंच विरोध करणं आहे. CAA कायदा आणला, त्यालाही विरोध केला.

Deepak Kulkarni

Mumbai News : विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार आणण्यासाठी महायुतीनं प्रचंड जोर लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्यासह दिग्गज नेतेमंडळींनी सभांचा धडाका लावला आहे. तर समोर महाविकास आघाडीनंही तगडं आव्हान निर्माण करत महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. यातच आता भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणाऱ्या अमित शाहांनी (Amit Shah) मुंबईतील आपल्याच पहिल्याच सभेत धक्कादायक विधान केलं आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुंबईतील घाटकोपरमध्ये मंगळवारी (ता.12) जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी महाराष्ट्रात महायुती सरकार नसतं तर मुंबई राहण्यासारखी राहिली नसती असं विधान केलं आहे. यामुळे नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.

अमित शाह म्हणाले, महायुती (Mahayuti) सरकारच्या काळात अटल सेतू बनवला गेला.त्याचा फायदा मुंबईला झाला. मुंबई-अहमदाबाद पहिली हायस्पीड रेल्वे बनत आहे.कोस्टल रोड बनवला आज त्याचाही फायदा दिसून येत आहे. समृद्धी महामार्गावरही वाहतूक सुरू आहे.आगामी काळात मुंबईचा व्यापार वाढणार आहे. धारावीचा पुनर्विकास होणार आहे.हे सगळं आघाडीवाले करु शकतील का? असा सवाल उपस्थित केला.

महाविकास आघाडीने फक्त विकासकामांना विरोधच केला.राज्यात महायुतीचं सरकार नसतं तर मुंबई राहण्यासारखी राहिली नसती असं वक्तव्य शाह यांनी आपल्या घाटकोपरच्या सभेतील भाषणात केलं. मी पूर्ण महाराष्ट्रात फिरून येथे आलो आहे.

इकडे तिकडे गेलो. पण आजच तुम्हांला मी या निवडणुकीचा परिणाम सांगतो.राज्यात महायुतीचं सरकार बनायला जाणार आहे. आणि आघाडीचा सुपडासाफ होणार आहे. मी काही दिवसांपूर्वी भाजपचं संकल्प पत्र समोर ठेवले आणि त्याचदिवशी मल्लिकार्जुन खर्गेंनी मविआचं संकल्प पत्र जनतेसमोर ठेवलं.

त्याच्या काही दिवस आधी खर्गेजींनी महाराष्ट्र काँग्रेसला सांगितले की, वचन असे द्या, जे पूर्ण करणार आहे. काँग्रेसच्या अध्यक्षालाच वचनावर विश्वास नाही, असा टोला लगावत शाह यांनी एका ठिकाणी मोदींजींची वचन म्हणजे काळ्या दगडावरची रेख असल्याचं मतही व्यक्त केलं.

अमित शाह म्हणाले, जे जे वचनं दिलीत, ते पूर्ण करणार ही मोदींची गॅरंटी आहे.आणि आम्ही जे जे बोललो ते ते केलं. काश्मीरमधून 370 हटवलं.मी बिल घेऊन संसदेत उभा राहिलो, तेव्हा सर्व विरोधक काव काव करु लागले. ते बोलायला लागले की, 370 हटवू नका.मी विचारल का नको हटवू.ते म्हणाले, असं केलं तर रक्ताचे पाट वाहतील. पण सहा वर्षे झाले एक दगड फेकायची कोणाची हिंमत झाली नाही. मोदींनी देशाला आतंकवाद्यांपासुन मुक्त केलं असंही त्यांनी सभेत सांगितलं.

मी उद्धव ठाकरेंना विचारतो.तुम्ही जनतेसमोर तुमची भूमिका जाहीर करा की, 370 कलम पुन्हा हवं आहे का?पण ते सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत.पण मी राहुल गांधीना सांगतो की तुमची चौथी पिढी जरी आली, तरी कलम 370 हटणार नाही. आम्ही म्हणालो, राम मंदिर बनवणार.आम्ही मंदिर त्याच जागी बनवलं आणि तारीखही सांगितली व प्राणप्रतिष्ठा करुन जय श्री राम केलं.आजपर्यंत राहुल गांधी,शरद पवार तिकडे गेले नाही.त्यांची हिंमत झाली नाही, असा घणाघातीह शाहांनी यावेळी केला.

भाजप नेते अमित शाह यांनी आपल्या भाषणात ट्रिपल तलाकवरही भाष्य केलं.ते म्हणाले, ट्रिपल तलाक हटवून चांगले केले की नाही.तेव्हा सगळे लोक विरोध करत होते.त्यांचं कामंच विरोध करणं आहे. CAA कायदा आणला, त्यालाही विरोध केला. राहुल गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत विरोध करतात. पण मोदी सरकार वक्फचा कायदा डंके की चोट पर बदलणार आहे.कोणाचीही संपत्ती हे वक्फची संपत्ती नाही होणार असं ठाम मतही त्यांनी व्यक्त केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT