Amit Shah News Sarkarnama
मुंबई

Amit Shah News : मुंबईतून अमित शाहांचा खळबळजनक दावा; म्हणाले, " २०१४ पर्यंत देशातील ६० टक्के लोकं हे..."

Deepak Kulkarni

Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक लक्ष्मण इनामदार व्याख्यानमाला कार्यक्रमात खळबळजनक विधान केलं आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा कृषी विभागापासून सहकार क्षेत्रं वेगळं करण्याचा निर्णय घेतला. हे करतानाच त्यांनी सहकार क्षेत्राला ऊर्जा देण्यासोबतच गती देण्याचंही मोठं काम केलं. या वेळी त्यांनी २०१४ ते २०२३ या आधी देशाच्या अर्थकारणाशी सुमारे ६० टक्के लोक हे जोडलेच गेले नव्हते, असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.

२०१४ पर्यंत देशातील सुमारे ६० टक्के लोक भारताच्या अर्थकारणाशी जोडले गेलेले नव्हते. या लोकांचे स्वत:चे सोडाच पण कुटुंबातील कुणाचंही बँकेत खाते नव्हते. ते रोजची कमाई, खर्च आपल्या पद्धतीने करत होते. त्यांची आर्थिक सुरक्षितता राम भरोसेच होती, तसेच त्यांचे घर नव्हते, कुठलंही स्वप्नही नव्हतं, असा मोठा दावा शाह यांनी केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) मुंबई दौऱ्यावर आहेत. या वेळी मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी माजी आरएसएस प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांच्या आठवणींना उजाळा दिला. लक्ष्मणराव पारसमणी होते, असे गौरवोद्वार त्यांनी काढले.

शाह म्हणाले, मोदींनी नऊ वर्षांत जवळपास ६० टक्के लोकांचं बँकेत खातं उघडलं, त्यांना आर्थिक मदतही पोहोचवली. तसेच या लोकांना घरासोबतच पिण्याचं पाणी, घरगुती गॅस दिला, वीज दिली. त्यांना रोजच्या उदरनिर्वाहासाठी पाच किलो धान्य दिले. यातून त्यांची पोटापाण्याची व्यवस्था केली. याद्वारे त्यांनी साठ टक्के लोकांना उर्जा दिली. ज्यांचे आयुष्य उद्या काय खायचं या चिंतेत सुरू होतं, त्यांच्या उद्याची चिंता मिटली. ज्यांच्या आयुष्यात कुठे राहायचे ही चिंता होती ती समाप्त झाली. त्यांच्या घरात वीज, गॅस, शौचालय तर आलेच शिवाय त्यांची आरोग्यासह सगळीच काळजी दूर झाली, असेही शाह यांनी या वेळी सांगितले.

आता त्या लोकांचं बँकेत खाते उघडल्यामुळे ते देशाच्या अर्थकारणाशी जोडले गेले. आणि त्या साठ टक्के लोकांना देशाच्या विकासात आपलं योगदान द्यायचे आहे. सहकार क्षेत्र हा असा एकमेव मार्ग आहे, जो या लोकांना देशाच्या विकासाशी जोडले जाण्यासाठी साहाय्य करेल.

आता त्या लोकांचं बँकेत खातं उघडल्यामुळे ते देशाच्या अर्थकारणाशी जोडले गेले. आणि त्या साठ टक्के लोकांना देशाच्या विकासात आपलं योगदान द्यायचं आहे. सहकार क्षेत्र हा असा एकमेव मार्ग आहे, जो या लोकांना देशाच्या विकासाशी जोडले जाण्यासाठी साहाय्य करेल, असेही शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले, आम्ही सरकारी यंत्रणेत बरेचसे बदल केले आहेत. आयकर विभागाच्या अंतर्गत सहकार व खासगी क्षेत्रांना एका पातळीवर आणण्याचं काम देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) केले आहे. सहकार क्षेत्र हे दुर्लक्षित होतंय, पाठीमागे पडते आहे असे चुकूनही वाटू देऊ नका. सहकार क्षेत्राचं भविष्य आणखी उज्ज्वल होत आहे. देशातील लोकांना अर्थकारणाशी जोडण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

'' शाह किती कणखर आहेत, याचा अनुभव मला जास्त..''

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी माजी आरएसएस प्रचारक लक्ष्मणराव इनामदार व्याख्यानमाला कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) अमित शाह यांना एक कणखर नेता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. पण, शाह किती कणखर आहेत याचा अनुभव मला जास्त आहे. जी काही राज्यात वर्षभरात क्रांती झाली त्यात...त्यामुळे म्हणतो मला त्यांचा जास्त अनुभव आहे.

शिंदे म्हणाले,, त्यावेळी रात्री- अपरात्री बैठका व्हायच्या. शाह यांनी एकदा शब्द दिला की तो दिलाच. इतिहास वाचायचा नसतो इतिहास घडवायचा असतो, असे अमित भाईंचे म्हणणे असते, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी या वेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT