Ram Shinde Secret Explosion : रोहित पवारांनी २०१९ मध्ये चंद्रकांतदादांना भेटून हडपसरमधून भाजपचे तिकिट मागितले होते; राम शिंदेंचा गौप्यस्फोट

NCP Vs BJP : आमदार रोहित पवारांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं राजकीय तिकीट ब्लॅकमेल करूनच मिळविल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं आहे
Rohit Pawar-Ram Shinde
Rohit Pawar-Ram ShindeSarkarnama

Nagar News : अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याआधीच आमदार रोहित पवार भाजपसोबत जाण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट केला होता. यावर आता भाजपचे आमदार राम शिंदे यांनी रोहित पवारांवर मोठा आरोप करत गौप्यस्फोट केला आहे. आमदार रोहित पवारांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं राजकीय तिकीट ब्लॅकमेल करूनच मिळविल्याचं राम शिंदे यांनी म्हटलं आहे. (Rohit Pawar met Chandrakant Dada in 2019 and asked for BJP ticket from Hadapsar: Ram Shinde's secret explosion)

Rohit Pawar-Ram Shinde
Nilesh Lanke Vs Vikhe Patil : आमदार नीलेश लंके भंडाऱ्यात न्हाले अन्‌ कार्यकर्त्यांनी विखे पाटलांना टोमणे मारले

याबाबत चौंडीत आपल्या निवासस्थानी राम शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, २०१७ मध्ये रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धमकी दिली होती. जिल्हा परिषदेचे तिकीट देता की मी भाजपत जाऊ. तसेच रोहित पवार यांनी २०१९ मध्ये हडपसरसाठी भाजपकडे त्यावेळचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटून तिकीट मागितलं होते, असाही गौप्यस्फोट राम शिंदे यांनी केला आहे.

रोहित पवार हे भाजपाच्या तिकिटासंदर्भात तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे हडपसर आणि शिवाजीनगर विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी गेले होते. मात्र तसे झाले तर आपली अडचण होईल, असे राष्ट्रवादी नेत्यांना वाटल्याने त्यांना कर्जत-जामखेड मतदातसंघांचे तिकीट देण्यात आले असल्याचे शिंदे म्हणाले.

Rohit Pawar-Ram Shinde
Ramesh Kadam In Mohol : माजी आमदार रमेश कदमांसाठी मनसेच्याही स्वागत पायघड्या; मोहोळ मतदारसंघात उद्या ८ वर्षांनंतर येणार...

अजित पवार हे ३० वर्षापासून राजकारण करत आहेत, त्यामुळे ते नेते झाले. आपल्यात तेवढी क्षमता आहे का? हे ओळखून वक्तव्य करावं, असा टोलाही राम शिंदे यांनी रोहित पवारांना लगावला आहे. कोणाच्या कपाळाला कपाळ घासून यश मिळत नाही, असा खोचक सल्लाही त्यांनी रोहित पवार यांना दिला आहे.

Rohit Pawar-Ram Shinde
Konkan Politics : दापोलीत भाजप कदमांना साथ देईल; पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वाद विसरतील काय?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com