Amit Thackeray with Ashish Shelar – Exams postponed during Ganesh festival for student convenience. sarkarnama
मुंबई

Amit Thackeray News : अमित ठाकरेंनी मानले मंत्री आशिष शेलारांचे आभार, अवघ्या तीन दिवसात 'ती' मागणी मान्य!

Amit Thackeray Thanks Ashish Shelar : मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांची भेट घेतली होती. या भेटीच्या तीन दिवसानंतर अमित यांनी आशिष शेलार यांचे आभार मानले आहेत.

Roshan More

Amit Thackeray News : तीन दिवसांपूर्वी (24 ऑगस्ट) मनसेचे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली होती. अचानक झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, गणेशोत्सवात काळात विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शेलार यांच्याकडे केल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले होते.

या मागणीला प्रतिसाद देत आशिष शेलार यांच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून आदेश देत गणेशोत्सवा काळात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहे. त्यानंतर अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आशिष शेलार यांचे आभार मानले.

ते म्हणाले, 'हा राज्य महोत्सव म्हणून घोषित असूनही अनेक शाळा व महाविद्यालयांनी त्याच काळात परीक्षा ठेवून विद्यार्थ्यांचा आनंद हिरावून घेतला होता. या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केलेल्या ठाम मागणीला प्रतिसाद देत सरकार तर्फे शासन निर्णय जारी करण्यात आला असून गणेशोत्सव काळातील परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत.'

विद्यार्थ्यांना निर्धास्तपणे, ताणमुक्त होऊन, आपल्या कुटुंबासह गणेशोत्सवाचा आनंद लुटता यावा हीच आमची इच्छा होती. हा निर्णय म्हणजे आपल्या संस्कृतीचा विजय आहे, असे म्हणत या निर्णयासाठी आशिष शेलार यांचे अमित ठाकरेंनी आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरे शिवतीर्थावर येणार

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन करून निमंत्रण दिले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे सहपरिवार राज ठाकरेंचे निवासस्थान शीवतीर्थ येथे उपस्थित राहून गणरायाचे दर्शन घेणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT