Caste Validity Extension : मोठी बातमी! SEBC व OBC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, जात वैधतेसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ

Chandrakant Patil Announcement Obc SEBC Extension : राज्यातील एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखीन मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी SEBC आणि OBC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  2. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

  3. शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

Mumbai News : एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रवेशासाठी सादर करणे बंधनकारक आहे. सद्यस्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अडचणी येत आहेत. यामुळे पुन्हा एकदा या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास राज्य सरकारतर्फे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे. तर याआधी या दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जुलैअखेरपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्यात आली होती.

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुद वाढ देण्यात आल्याची माहिती चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

Chandrakant Patil
Chandrakant Patil : झेडपी अध्यक्ष अन् महापालिकेत महापौर भाजपचाच; स्थानिकच्या निवडणुकांसाठी चंद्रकांत पाटलांनी सांगितली व्यूहरचना

तर त्यांनी, ही माहिती देताना राज्य सरकारने मुदतवाढ देण्यामागचे कारण सांगितले. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या परंतु जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. मात्र अनेक विद्यार्थ्यांना मुदतीत प्रमाणपत्र सादर करणे शक्य झालेले नाही. त्यामुळेच ही मुदतवाढ दिली आहे. या निर्णयामुळे आता दिलेल्या कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र न दिलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत. त्यांना दिलासा मिळाला आहे. पण आता दिलेल्या मुदतवाढीत प्रमाणपत्र सादर न केल्यास मात्र त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होतील. त्यास ते संबंधित विद्यार्थीच जबाबदार असतील असेही सांगण्यात आले आहे.

राज्यात एसईबीसी आरक्षण अधिनियम, 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून लागू करण्यात आलं आहे. तर या प्रवर्गात प्रवेशाकरीता 10 टक्के आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तर हे आरक्षण न्या. शिंदे समितीच्या शिफारशीनुसार मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. ज्यात नव्याने कुणबी, कुणबी-मराठा किंवा मराठा कुणबी जातीचे म्हणजेच इतर मागास वर्ग प्रवर्गाचे (ओबीसी) प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) उपलब्ध असल्याची माहिती देखील मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे.

Chandrakant Patil
Chandrakant Patil Politics: सत्ताधारी आमदारालाच अटक, मुक्ताईनगर कडकडीत बंद, काय आहे कारण?

FAQs :

प्रश्न 1: कोणत्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ मिळाली आहे?
उत्तर: SEBC आणि OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रश्न 2: मुदतवाढ किती काळासाठी आहे?
उत्तर: जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

प्रश्न 3: कोणत्या अभ्यासक्रमांना ही सवलत लागू आहे?
उत्तर: अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना.

प्रश्न 4: हा निर्णय कोणी जाहीर केला?
उत्तर: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी.

प्रश्न 5: विद्यार्थ्यांना याचा काय फायदा होईल?
उत्तर: विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत अडथळा येणार नाही आणि त्यांना आवश्यक प्रमाणपत्र सादर करण्यास वेळ मिळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com